शिरूर तालुक्यातील करंदीत महिलेवर बलात्कार करणारा परप्रांतीय नराधम जेरबंद
शिरूर
( प्रतिनिधी ) करंदी ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यालगत राहणाऱ्या महिलेला दमदाटी करुन रात्रीच्या वेळी बलात्कार करुन पळालेल्या अज्ञात व्यक्तीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.
शिवप्रसाद भदई यादव (वय ३४ वर्षे रा. दत्तप्रसाद कॉलनी चाकण रोड शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सिरसिया बधणीचाफा ता. बरणी जि. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
करंदी ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यालगत राहणारी महिला घरात झोपलेली असताना मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास अंधारात एका इसमाने दरवाजाची कडी उघडून घरामध्ये येत महिलेला दमदाटी करुन तोंड दाबून आरडाओरडा केल्यास मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करुन कोणाला काही बोलली व आरडाओरडा केला तर बघ अशी धमकी देऊन पळून गेला होता, घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना पुन्हा सदर इसम महिलेच्या घराच्या परिसरात फिरत असल्याचे पिडीत महिलेला दिसल्याने महिलेने शिक्रापूर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी शिवप्रसाद भदई यादव वय ३४ वर्षे रा. दत्तप्रसाद कॉलनी चाकण रोड शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सिरसिया बधणीचाफा ता. बरणी जि. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश याला अटक करत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख हे करत आहे.

