शिरुर येथील सराईत गुन्हेगाराला एम पी डि ए कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्द
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहराजवळील सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलिसांच्या पथकाने एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
दिपक बबन गुंजाळ (वय वर्षे ३३ रा. गोलेगाव रोड, वासल्य हॉस्पीटल शेजारी, शिरुर ता. शिरुर जि.पुणे) असे तरुणाचे नाव आहे.
दिपक बबन गुंजाळ यांचे विरुध्द अवैधरित्या बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, संगणमत करुन घातक हत्यारांनो किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहचविणे व शिवीगाळ व दमदाटी करणे, बेकायदेशीरपणे घातक हत्याराचा वापर करुन संगणमत करुन घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहचविणे व शिवीगाळ व दमदाटी करणे या सारखे ३ गंभीर गुन्हे दाखल होते. तो सराईत धोकादायक असल्याने त्याचे विरुध्द एम पी डि ए कायदयांतर्गत कार्यवाही होणेकामी संदेश केंजळे यांनी संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी हा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे कडे आदेशासाठी पाठविला होता यावर त्यांनी दीपक गुंजाळ याला एम पी डि ए कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश दिल्याने शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पथकाने त्याचा शोध घेवुन त्यास दिनांक १३ डिसेंबर रोजी ताब्यात घेवुन मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे दाखल करुन स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, शिरुर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पोलिस हवालदार मंगेश थिगळे, तुषार पंधारे, संजु जाधव, पोलिस फौजदार शरद गावडे, पोलिस हवालदार परशराम सांगळे, पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, गणेश गोसावी, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ, रघुनाथ हळनोर, शिरुर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

