एकल महिलांच्या समस्यांचा निपटारा करणार - महेश डोके

9 Star News
0

 एकल महिलांच्या समस्यांचा निपटारा करणार - महेश डोके


शिरूर ( प्रतिनिधी ) 

         शिरूर तालुक्यातील एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मंडळ विभागाप्रमाणे मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून महिलांचे संबंधित खात्याकडे आलेले अर्ज व त्यांच्या समस्या निपटारा होईपर्यंत ट्रॅकिंग करण्यात येणार असल्याने महिलांना जलद लाभ मिळवून देण्यासाठी उपयोग होणार असल्याचे शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले.

                   पाबळ ता. शिरूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके बोलत होते, यावेळी विस्ताराधिकारी राम राठोड, समाजकल्याण वरिष्ठ सहाय्यक दिलीप धोत्रे, मंडळाधिकारी प्रमोद लोखंडे, बालविकास अधिकारी श्रीमती चोबे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी रजेश कट्टीमणी, पाबळचे सरपंच सोपान जाधव, उपसरपंच रोहिणी चव्हाण, माजी सरपंच सचिन वाबळे, धामारीच्या सरपंच सीमा शेळके, केंदूरच्या सरपंच अलका पऱ्हाड, ग्राम पंचायत अधिकारी संतोष गिरी यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान एकल महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभिनव संकल्पना मांडली असून शिरूर तालुक्यामध्ये सुमारे साडेचार हजार एकल महिला असताना त्यांना सक्षम व आरोग्यदायी बनविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना असून आरोग्य तपासणी आरोग्य शिबिर तसेच घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना, व्यवसायासाठी बँक कर्ज योजना अशा तीस योजनांचा समावेश आहे. शासकीय कार्यालयात त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत या उद्देशाने मंडल विभागात या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असताना यामाध्यमातून महिलेच्या आलेल्या प्रत्येक अर्जावर कार्यवाही करण्यासाठी त्या अर्जाची या माध्यमातून महिलेच्या आलेल्या प्रत्येक अर्जावर कार्यवाही करण्यासाठी त्या अर्जाचे ट्रॅकिंग करणार असल्यामुळे कमी कालावधीमध्ये त्यांच्या समस्या निराकारण करन होणार असल्याचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले.

फोटो खालील ओळ – पाबळ त. शिरुर येथे एकल महिलांच्या मेळाव्यामध्ये बोलताना गटविकास अधिकारी महेश डोके.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!