शिक्रापूरात भर लोकवस्तीतील जैन मंदिरत चोरी
शिरूर ( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरात भर लोकवस्तीत असलेल्या जैन मंदिरच्या कंपाउंडची जाळी तोडून चोरट्यांनी मंदिरातील पंच धातूच्या मूर्त्यांसह चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना घडली असल्याने आता याभागात मंदिरही असुरक्षित झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आले.
याबाबत पुजारी श्रीपाल विक्रमसिंह राठोड वय ३६ वर्षे रा. जैन मंदिर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरात भर लोकवस्तीत असलेल्या जैन मंदिराचे पुजारी श्रीपाल राठोड हे दिनांक २६ डिसेंबर सायंकाळच्या सुमारास मंदिराची आरती करुन मंदिरच्या सर्व दरवाजांना कुलूप लावून मंदिरामागील घरात झोपले होते, सकाळच्या सुमारास पुजारी श्रीपाल राठोड उठून मंदिरच्या गेट कडे आले असता त्यांना मंदिराचे तीनही दरवाजे उघडे असल्याचे दिसल्याने त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात पाहणी केली असता मंदिरातील पंचधातूच्या दोन मुर्त्या, चांदीचा नारळ, देवाच्य मूर्तीवरील चांदीचे हार यासह चांदीचे आदी साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आल्याने राठोड यांनी मंदिराच्या पाठीमागील बाजूला जाऊन पाहिले असता मंदिरच्या कंपाउंडची जाळी तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले, याबाबत पुजारी श्रीपाल विक्रमसिंह राठोड वय ३६ वर्षे रा. जैन मंदिर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथील जैन मंदिरात चोरट्यांनी केलेली चोरी.

