शिक्रापुरात ट्रॅक्टरच्या धडकेत 12 वर्षीय बालकाचा मृत्यू
मुलगा ठार तर मुलाची आई गंभीर जखमी
शिरूर ( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे दुचाकीहून मुलाला घेऊन चाललेल्या महिलेच्या दुचाकीला ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागून झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी होऊन रुद्र सुनील खरपुडे हा मुलगा जागीच ठार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता शिरूर येथील पुणे नगर महामार्गावरून एक्सिस बँकेत कामाला असलेल्या हेमलता खरपुडे या सायंकाळच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच १२ क्यू झेड ४२८४ या दुचाकीहून त्यांचा मुलगा रुद्र यास घेऊन पाबळ चौकातून जुन्या पुलाकडे जात असताना पुणे नगर महामार्गावर मारुती मंदिर शेजारी नगर बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एमएच १२ यु एस ८४९२ या ट्रॅक्टर व एम एच १२ ए एक्स ८११६ या ट्रॉलीचा खरपुडे यांच्या दुचाकीला धक्का लागून अपघात झाला, यावेळी अपघातात दोघ मायलेक जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, सदर अपघातात हेमलता सुनील खरपुडे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे या जखमी होऊन रुद्र सुनील खरपुडे वय १२ वर्षे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, घडलेल्या प्रकाराबबत संपत प्रकाश रासकर वय ३८ वर्षे सध्या रा. इकोग्राम सोसायटी शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. कासारी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे हे करत आहे.
सोबत - मयत रुद्र खरपुडे चा फोटो.

