शिरूर नगर परिषद प्रारूप मतदार यादीत हरकती व सूचनांच्या वेळी खोटे आधार कार्ड व खोटे अर्ज सह्या केल्याप्रकरणी संबंधिताचा शोध घेऊन फौजदरी कारवाई करावी

9 Star News
0

 शिरूर नगर परिषद प्रारूप मतदार यादीत हरकती व सूचनांच्या वेळी खोटे आधार कार्ड व खोटे अर्ज सह्या केल्याप्रकरणी संबंधिताचा शोध घेऊन फौजदरी कारवाई करावी


शिरूर प्रतिनिधी 

        शिरूर नगरपरिषद निवडणूक मतदार यादी मतदारांची अदलाबदल तर हरकती सूचना मध्ये अनेकांची नावे बोगस आधार कार्ड व सह्या करून अर्ज दाखल केले असून याची चौकशी करून या मतदार याद्या पूर्ववत कराव्यात व खोटे अर्ज देणारे यांची सी सी टीव्ही पाहून पोलिसांमार्फत चौकशी करावी व शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिरूर विधानसभेचे माजी आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत केली .

     यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तर शिरूर नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिरूर विकास आघाडीचे प्रमूख प्रकाशभाऊ धारिवाल व आघाडीचे अध्यक्ष अँड सुभाष पवार हे जो निर्णय घेतील त्यांच्या बरोबर आम्ही राहणार असल्याचे पवार म्हणाले.

        यावेळी माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, अशोक पवार,मंगेश खांडरे, मायाताई गायकवाड, आबीद शेख , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक कैलास भोसले, व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

      मी आजपर्यंत भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एखाद्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमात भेटलो परंतु पक्ष स्थलांतरासाठी कुठलीही चर्चा केली नाही असे माजी आमदार अशोक पवार यांनी स्पष्ट सांगून,शिरूर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढवणार असून, वरिष्ठांनी सांगितलं तर महाविकास आघाडी च्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाईल तसा आदेश किंवा पक्षाचा निर्णय होईल त्याप्रमाणे निवडणुकी लढवल्या जातील असेही माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

            शिरूर नगर परिषद करीता ज्या प्रारूप मतदार यादी केल्यात त्या कोणाच्या सांगण्यावरून केल्या व प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा आरोप माजी आमदार अशोक पवार यांनी आरोप करून याबाबत मुंबई हायकोर्टात माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी यांनी याचिका दाखल केली असल्याचा त्यांनी सांगितले.

    

        

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!