शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग स्वकर्तुत्व मात्र शून्य..

9 Star News
0

 शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग स्वकर्तुत्व मात्र शून्य..


शिरूर ,(प्रतिनिधी )

शिरूर नगरपरिषद निवडणुक डोळ्यासमोर येऊन ठेवली असून इच्छुकांनी भाऊ गर्दी केली असून ,नेत्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे सुरू आहेत त्याबरोबर भूलभूलैया चा खेळ सुरू आहे इच्छुकांचे गुढग्याला बाशिंग आणि उतावळा नवरा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

प्रत्येकाला हवी संधी पाच वर्ष दहा वर्ष संधी मिळवूनही काहींनी केला कारभार शून्य*आता निवडणूक लागण्या अगोदर अनेकांनी मतदारांची पाय पकडण्याची ढोंग सुरू केली आहे.

     शिरूर नगर परिषद निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपलि असून ,अनेक इच्छुक या निवडणुकी साठी तयारीला लागले आहे .सौम्या -गोम्या पासून ते दिग्गजांचा यात समावेश आहे .शिरूर नगरपालिका मधे सध्या चोवीस जागा आहेत तर नगराध्यक्ष जनतेतून निवडायचा आहे. .सध्या शहरात दोन प्रभाग झाला आहे . तर नगराध्यक्ष मागासवर्गीय सर्वसाधारण महिला(ओबीसी महिला) प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

       निवडणुका कधी लागेल आणि कधी आचारसंहिता लागेल सांगता येत नाही.सध्या निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे .प्रत्येक गल्लीत इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. प्रत्येकजण आता उसने पासने पैसे घेऊन शहरात, गल्लीत विविध कार्यक्रम घेत आहे आपण इच्छुक असल्याचे सांगताना दिसत आहे .

  सध्या प्रत्येक प्रभागात प्रत्येक जागेकरिता दहा जण आज इच्छुक असून प्रत्येकाला वाटते मलाच उमेदवारी मिळणार त्यामुळे आपापले नेते त्यांच्या बरोबर असलेली फोटो सोशल मिडियच्या साह्याने नागरिकांन पर्यंत पौहचवत आहे व मीच कसा नेत्यांच्या जवळ आहे हे दाखवत आहे .तर काहीजण कट्ट्यावर बसून शहरातील विविध गोष्टीवर नजर ठेवून तेथून राजकारण हालवत आहे तर अनेकाना बळेच घोड्यावर बसवत आहे .त्यामुळे शहरांत अनेक गट बनले असून ,सगळ्यात पक्षात ही नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे .

       सध्या प्रत्येक ठिकाणी शहरात सोशल मीडियावर मोठी हलचल सुरू आहे .वाढदिवस कोणाचा असो हालचाल कट्टर समर्थक की झाले मग झाली आपली हवा असे वारे अनेकांच्या डोक्यात घुसले आहे .त्यातून मग अनेक नेते मंडळी त्याच्या एखाद्या कार्यक्रमात गेले की तो हरभराच्या झाडावर जाऊन बसला कोणाचे ऐकत नसल्याचे दिसून येत आहे .अनेक जण पैशाची हवा करीत आहे .किती लागूदे असे खुले आम म्हणतात .यामुळे अनेक इच्छुकांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहे .

          शिरूर शहर हे ३८ हजाराच्या आसपास मतदार असलेले शहर असून , प्रत्येक प्रभागात अडीच तर साडेतीन हजार मतदार असणार आहे.

    अनेक तरुण या शहरात आहेत परंतु यामध्ये अजून एकालाही समाजकार्य काय असते हे माहिती नाही त्यामुळे नेते सोडून एकलाही समाज उभा करीत आहे असा उमेदवार शहरात नाही ही सर्वात मोठी खंत आहे .


       येथील अनेकांना केवळ प्रतिष्ठा व मान मिळावा यांसाठी नगरसेवक पद हवे आहे .त्यातून समाजकार्य करावे नगरसेवक पासून आमदार ,खासदार ,मंत्री व्हावे असे कोणाला वाटत नाही फक्त हवी खोटी प्रतिष्ठा त्यासाठीच इच्छुकांनी या निवडणुकी करिता मोर्चे बांधणी सुरू केली आहे .उतावळा नवरा गुढ्घ्याला बाशिंग अशी परिस्थिती निर्माण झाली .

त्यामूळे शिरूर नगर परिषदेचे राजकारनात हालचाल सुरु आहे. परंतू सगळ्यांची मदार नेत्यांवर स्वतः चे कर्तुत्व शून्य..... निवडणूक लढवायची एवढीच इच्छा.... नेत्यांची मर्जी साठी शिरूर शहरात खेकडा संस्कृती मात्र जोमात आहे.... तरी कोणाचे कुठे ठीगाळ बसेल यासाठी प्रयत्न सुरु असून मी तिकीट बसवतो

 असे म्हणणारे स्व्यंघोषित नेत्यांची चलती तर नेत्यांच्या कानाला लागणारे बोलघेवडे.... यामुळे शिरूर शहरात ह्याला गाड त्याला गाड एक ग्रूप सक्रिय... यामुळें शिरूर शहरात शेकडो इच्छूक जागा मात्र कमी यामुळें राजकारण सुरू आहे. त्यामूळे येणाऱ्या शिरूर नगर परिषद निवडणूक म्हणजे गुढग्याला बाशिंग आणि उतावळा नवरा अशी झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!