मॉडेल कॉलनी पुणे येथील जैन समाजाची तीन एकर जागा बेकायदेशीर विकणाऱ्या विश्वस्त मंडळ व जागा घेणारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा
शिरूर प्रतिनिधी
"पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडीने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करत विश्वस्त संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने विक्री केल्याप्रकरणी जैन समाज आक्रमक झाला असून या ट्रस्टी व जमीन घेणारे यांचे संगनमत असून या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिरूरचे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन सकल जैन समाज शिरूर यांच्यावतीने तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना दिले आहे.
शिरूरचे संघपती भरत चोरडिया ,कपिल बोरा ,प्रीतेश कोठारी,विनोद धारीवाल ,अनिल बोरा प्रशांत संचेती ,सुनील बोरा ,कुणाल बोरा,निलेश धारीवाल ,आदेश धारीवाल ,प्रिंस बरमेचा ,राजू बोथरा ,अमित कोठारी अमित गादीया ,महेश कटारिया ,शीतल नहार ,यश मुथा , अँड .राहुल बोरा लौकिक बोरा
योगेश चांडलिया ,ऋषी कोठारी ,अमित लोढा , हर्षद दुगड, पुष्कर बोरा , नितीन मुथा मनोज बोरा व मोठ्याप्रमाणात सकल जैन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या जागेत शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावाने जैन विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुविधा १९६० साला पासून सुरु करण्यात आली मात्र संस्थेची इमारत जीर्ण व मोडकळीस आल्याचे कारण विश्वस्त मंडळाने दर्शवीत राज्याचे धर्मदाय आयुक्त याच्याकडे संस्थेची संपूर्ण तीन एकर जागा विक्री करण्यासाठी दिनांक १३.२.२०२५ रोजी परवानगी मागितली सदर बाबत दिनाक ४.४.२०२५ रोजी धर्मदाय आयुक्त यानी विश्वस्त मंडळाला जागा विक्री करण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार विश्वस्त मंडळांनी दिनाक १५/५/२०२५ रोजी गोखले बिल्डर या विकसकाला संस्थेची संपूर्ण तीन एकर जमीन ३११ कोटी रुपयांना विक्री करण्यासाठी करार केला. त्यानुसार विकसक है संस्थेला २३० कोटी रुपये देतील व उर्वरित ८१ कोटी रुपयांच्या बदल्यात विकसक है ट्रस्ट सस्थेला दहा गुठे क्षेत्र त्यावर साडेतीन गुंठे क्षेत्रात 40 हजार स्क्वेअर फुट बांधकाम 999 वर्षाच्या भाडेकरारादवारे देतील.
संस्थेच्या घटनेनुसार (ट्रस्टडीड) विश्वस्त मंडळाला अशा पधतीने जागा विक्री करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तरी त्यांनी अशा प्रकारचे चुकीचे कृत्य केले असून यामुळे संपूर्ण जैन समाजाच्या भावना दुखावले आहेत अशा ट्रस्टींवर व जागा घेणारे यांची चौकशी करून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

