मुख्यपृष्ठ shirur पुणे स्वारगेट बस स्थानक अत्याचार करणारा नाराधम शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा सराईत गुन्हेगार.. निघाला
पुणे स्वारगेट बस स्थानक अत्याचार करणारा नाराधम शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा सराईत गुन्हेगार.. निघाला
9 Star News
9 Star News
फेब्रुवारी २६, २०२५2 minute read
Your Responsive Ads code (Google Ads)
शिरूर प्रतिनिधी
पूण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी शिरूर तालुक्यातील गुणाट चा सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे असल्याचा निष्पन्न झाला असून हा फरार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक २६ वर्षाची तरुणी पुण्याहून आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास ती स्वारगेट बसस्थानकावर पोहोचली. त्यावेळी एकाने फलटणला जाणारी बस इकडे लागत नाही तिकडे लागते असे सांगितले. त्यावर तरुणीने नकार देत बस इथेच लागते असे सांगितले.
त्यावर मी इथे गेली दहा वर्षे काम करत आहे असे सांगून फलटणला जाणारी बस तिकडेच लागते असे आरोपीने तरुणीला सांगितले. आरोपीने तरुणीला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. दरवाजा उघडून आतमध्ये जा असे आरोपीने तरुणीला सांगितले. बसमध्ये अंधार होता. तरुणी बसमध्ये गेली. तिच्यापाठोपाठ आरोपी देखील बसमध्ये चढला. त्याने बसचा दरवाजा बंद करून तरुणीवर बलात्कार केला.
या घटनेनंतर तरुणी पुढे फलटणला जाण्यास निघाली. मात्र ती अर्ध्या वाटेवरून परत आली. तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात घडलेला प्रसंग सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सिसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये आरोपी गाडे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गाडे याच्यावर यापूर्वी चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आरोपीचा शोढ घेत आहे.
तरुणीने सांगितली आपबिती
ही घटना घडल्यानंतर पुण्यात त्या तरूणीची कोणतीही मदत केली नाही. ही तरूणी दुसऱ्या बसने फलटणला आपल्या घरी पोहचली. यावेळी तिनं अर्ध्यावाटेत असतानाच मित्राला फोन करुन माहिती दिली.
तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु
पिडीत तरुणीची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. चाचणीची माहिती संध्याकाळपर्यंत मिळेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या पिडीत तरुणी ससुन रुग्णालयात अॅडमिट असुन तिच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांची ८ पथक सक्रीय
पीडित तरुणीने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केली आहेत. या पथकांकडून दत्तात्रय गाडेचा कसून शोध घेतला जात आहे. दत्तात्रय गाडे हा पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातील शेतात लपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून शेतात डॉग स्क्वाडच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या भावाला गाठले असून त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे.
कोण आहे दत्तात्रय गाडे ?
शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव दत्तात्रय गाडे आहे. दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहेत. दत्ता रामदास गाडे शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा आहे.
त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. धमकी देणं, चेन स्नॅचींग रोड रॉबरी, यासारखे गुन्हे दत्ता गाडे याच्यावर आहेत.
दत्तात्रय गाडे हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. गाडे याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गाडे हा मूळचा शिरूरचा आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून दत्ता गाडे याचा शोध घेतला जात आहे. तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला आहे.
सराईत दत्ता गाडे हा शिरूर पोलीस स्टेशन येथील 2019 मधील चोरीतील सराईत गुन्हेगार तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे ,पोलिस कर्मचारी संजय जाधव यांनी कारवाई करून दहा लाखाचा ऐवज जप्त केला होता.