शिरूर बाफना मळा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून निघून खुन करणा-या आरोपींना ३ तासाच्या आत आवळल्या मुसक्या" शिरूर पोलिस स्टेशन तपासपथकाची व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहर परीसरात बाफनामळा येथे जुन्या वादातून तीन मित्रांनी आपल्या मित्राचा मारहाण करीत डोक्यात दगडी तोड घालून निर्घृण खून केल्याची कबुली दिली असून आरोपी मध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर तीन तासांच्या आत आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली होती, परंतु शिरूर पोलिसांनी तीन तासांत आरोपी ताब्यात घेतल्याने शिरूर शहरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.
याप्रकरणी सचिन विलास मांमडवाड (वय २४ वर्ष, रा सिद्धार्थनगर शिरूर ता शिरूर नि पुणे), यश उर्फ श्रेयस महेश (मांदीलकर वय २० वर्ष, रा. साईनगर, शिरूर ता शिरूर पुणे) यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
या घटनेत संतोष मारुती ढोबळे (वय २१, रा. वाडा कॉलनी, शिरूर, मूळ रा. असोला ढोपळा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) या तरुणाचा खून झाला आहे.
याबाबत मयत मुलाचे वडील मारुती ढोबळे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिस हेल्पलाइन ११२ वर शिरुरच्या बाफना मळा गंगानगर परिसरातील झुडपांमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीमाभिंतीलगत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाची ओळख त्याच्या खिशात सापडलेल्या पाकिटातील कागदपत्रे व छायाचित्रावरून पटली.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन शिरूर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, परसराम सांगळे, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार सचिन भोई, विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील, वैभव शेलार व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, राजु मोमीन, संजु जाधव, पोलीस अंमलदार सागर धुमाळ या पथकाने जवळ टाकणारे सीसीटीव्ही मोबाईल लोकेशन तांत्रिक माहितीचे अधिकारी आरोपी निष्पन्न करून हे आरोपी साईनगर शिरूर येथे लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर वरील पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.जुन्या भांडणाचे कारणावरून मयत संतोष मारूती ढोबळे याला बोलवून घेऊन त्याचे डोक्यात दगडी तोड घालुन निघुण खुन केल्याची तिन्ही आरोपींनी कबुली दिली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल जाधव करीत आहे.