शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरात नुकतीच नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून प्रभाग रचना ही जाहीर झाली आहे प्रभाग रचनेची आरक्षण ही निघाले आहे व आज प्रारूप मतदार यादी जाहीर झाली परंतु प्रभागाप्रमाणे मतदार यादी नाहीच ! शेकडो मतदार गायब जबाबदार प्रशासनाचे हात वर...
या मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसत असून, दोन चार मतदार नावे नव्हे तर शेकडो मतदारांची अदलाबदल झाली आहे.अनेक मतदार यादीतील नावे शिरूर नगर परिषदेने या प्रभागातून त्या प्रभागात टाकल्याची चित्र दिसून आले असून यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नगर परिषदेचे विरोधात नाराजीचा सुरू उमटू लागला आहे. प्रशासनाने हात मात्र हात वर केले आहे.... याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे.
प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन, चार पाच, सहा सात, आठ या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान अदलाबदल झाले आहे तर आठ नंबर प्रभाग 80 टक्के मतदान दुसऱ्या मतदार यादीमध्ये गेले आहे .
तर नगर परिषदेने याबाबत हरकती घेऊन आपले नाव जेथे आहे तेथे टाकण्यासाठी पुराव्यासह अर्ज करण्याची आव्हान केले आहे परंतु हा कालावधी तेरा ऑक्टोबर पर्यंतच आहे हा कालावधी खूप कमी आहे.
त्यामुळे शिरूर शहरातील नागरिकांनी सतर्क राहून आपण आपल्या प्रभागांमध्ये आहेत का यासाठी प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाले असून त्या पाहून आपले नाव आपल्या प्रभागांमध्ये येण्यासाठी शिरूर नगर परिषदेमध्ये अर्ज करायचा आहे.
शिरूर नगरपालिकेच्या वतीने अशाप्रकारे चूक करूनही नागरिकांवर याचे खापर फोडत असल्याचे दिसून येत आहे. चुका नगरपरिषदेच्या भोगावे लागते मतदारांना यासाठी शिरूर नगरपरिषदेची अधिकारी बिलो यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी ही नागरिकांमधून होत आहे.
शिरूर नगर परिषदेमध्ये अशा प्रकारे हरकती घेण्यासाठी व आपली नावे आपल्या प्रभागांमध्ये येण्यासाठी अर्ज करावयाचा आहे तो उपलब्ध केला आहे. शहरातील सर्वच सुज्ञ नागरिकांनी सतर्क राहून आपला तक्रारी अर्ज करून आपले मतदान आपल्या प्रभागामध्ये येण्यासाठी इच्छुक उमेदवार प्रमुख कार्यकर्ते यांच्या मदतीने हा अर्ज करण्याची गरज आहे .
शिरूर नगर परिषदेची प्रभाग रचना बरोबर आहे परंतु प्रभाग रचनेप्रमाणे मतदार गायब झाले असून इतर प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात मतदार संख्या वाढली आहे तर काही मतदार दुसऱ्याच मतदार यादी मध्ये गेले असल्याचे आढळले असून याबाबत प्रशासनाने हात वरती केले आहे तरी शिरूर नगरपरिषद प्रशासनाने या मतदार याद्या दुरुस्त कराव्यात.
सुनील जाधव, माजी शहर प्रमुख शिवसेना
शिरूर नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे प्रभाग रचनेप्रमाणे मतदार यादी केल्या नसून अनेक प्रभागांमध्ये मतदार दुसऱ्याच प्रभागात गेले ते दिसून येत आहे. याबाबत नगर परिषदेने हात वरती केले असून नागरिकांनी अर्ज करावा असे नगरपरिषद सांगत आहे चुका तुमच्या नागरिकांना किंवा मतदारांना त्रास का ?
संतोष शितोळे सामाजिक कार्यकर्ते शिरूर
कोणतेही मतदारांचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले असल्यास त्यांनी बेब साईट वरती प्रसिद्ध केलेल्या स्वत: चे नाव बदली करावयाचे असल्यास नमूना अ व तक्रारदार यांना मतदाराबाबत काही दुरुस्ती करावयाची असल्यास नमूना ब नुसार रहिवासी पुरावा दस्तऐवजा सोबत नगरपरिषद नागरी सुविधा केंद्र येथे दि. १३/१०/२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना सादर करावेत.
प्रितम पाटील, मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद