शिरूर पंचायत समिती १४ गण करीता आरक्षण सोडत जाहीर... तर जिल्हा परिषदेच्या ७ गटासाठी आरक्षण अनेकांचे स्वप्न यंदाच्या आरक्षण सोडतीमुळे भंगले

9 Star News
0

 शिरूर पंचायत समिती १४ गण करीता आरक्षण सोडत जाहीर... तर जिल्हा परिषदेच्या ७ गटासाठी आरक्षण 

अनेकांचे स्वप्न यंदाच्या आरक्षण सोडतीमुळे भंगले 


शिरूर दिनांक प्रतिनिधी 

           शिरूर पंचायत समितीच्या 14 गणांची आज प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी व शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने सोडत घेऊन गण निहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 

      शिरूर पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांनी आणि नागरिकांनी पाठ फिरवली असून, याबाबत नागरिक इच्छुक उदासीन का ?

       

         शिरूर नवीन प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालय येथील सहभागृहामध्ये ही आरक्षण सोडत पार पडली १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत स्वयम प्रकाश फरगडे या शाळकरी मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आली आहे.

      शिरूर तालुक्यातील पंचायत समितीतील १४ गणांची सोडत नव्याने 2025 नुसार काढण्यात आली असून, या 14 गणांमध्ये अनुसूचित जाती लोकसंख्या जास्त असणारे गण वडगाव रासाई असल्याने तेथे अनुसूचित जाती आरक्षण जाहीर करण्यात आली तर शिरूर तालुक्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रमाण अतिशय कमी असल्याने या ठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण निघत नाही. तर सर्वच जागेमध्ये ओबीसीच्या संख्येनुसार तीन जागेवर ओबीसी आरक्षण होत असल्याने १३ जागेतून तीन जागा ओबीसी चिठ्ठी काढून काढण्यात आल्या त्यानंतर त्याच्यातून दोन जागा महिला ओबीसी साठी काढण्यात आल्या तर एक जागा ओबीसी सर्वसाधारण साठी ठेवण्यात आली. 

त्यानंतर उरलेल्या दहा जागेमधून सर्वसाधारण महिलांसाठी पाच जागेसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण करण्यात आले 

 निहाय आरक्षण पुढील प्रमाणे 

वडगाव रासाई अनुसूचित जाती 

मांडवगण फराटा सर्वसाधारण महिला 

शिरूर ग्रामीण ओबीसी महिला 

न्हावरे सर्वसाधारण 

पाबळ ओबीसी 

केंदूर सर्वसाधारण महिला 

कवठे यमाई सर्वसाधारण महिला 

टाकळी हाजी ओबीसी महिला 

तळेगाव ढमढेरे सर्वसाधारण महिला 

रांजणगाव सांडस सर्वसाधारण 

शिक्रापूर सर्वसाधारण  

सणसवाडी सर्वसाधारण महिला 

रांजणगाव गणपती सर्वसाधारण 

कारेगाव सर्वसाधारण 


जिल्हा परिषद गट आरक्षण २०२५


1. वडगाव रासाई-मांडवगण फराटा-इतर मागासवर्ग सर्वसाधारण

2. टाकळीहाजी कवठे यमाई- सर्वसाधारण पुरुष

3. शिरूर ग्रामीण न्हावरे - इतर मागासवर्ग (OBC) महिला

4. रांजणगाव गणपती-कारेगाव - सर्वसाधारण महिला

5. केंदुर-पाबळ - सर्वसाधारण पुरुष

6. शिक्रापूर-सणसवाडी - सर्वसाधरण महिला

7. तळेगाव ढमढरे-रां

जणगाव सांडस - सर्वसाधारण महिला



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!