गावठी हातभट्टी निर्मिती व दारू विक्रीवर शिरूर पोलिसांची मोठी कारवाई सव्वा लाखाचा ऐवज जप्त संदेश केंजळे पोलिस निरीक्षक
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील कवठे यमाई , पिंपरखेड जांबुत व आमदाबाद या चार ठिकाणी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पथकाने छापा टाकून दारू बनवण्याचे रसायन व दारूभट्टी यांच्यावर कारवाई करून एक लाख 23 हजार 715 रुपये किमतीचा ऐवज जप्त नष्ट केला आहे. अवैध गावठी दारू विरोधात शिरूर पोलीस स्टेशन ॲक्शन मोडवर.
याप्रकरणी सागर गणपत गडगुळ (रा. कवठे यमाई), संदिप निवृत्ती मुंजाळ (रा. कवठे यमाई), भाऊसाहेब सावळेराम भोर (रा. पिंपरखेड), प्रविण कैलास सोनवणे (रा. जांबुत), आंबादास सिताराम तिळघाम (रा. अकोला, जि. नागपूर) या पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिरूर पोलिसांनी गावठी हातभट्टी निर्मिती व देशी-विदेशी दारू विक्रीवर मोठी धडक कारवाई केली आहे. शिरूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना गोपनीय माहिती मिळाली की शिरूर तालुक्यातील कवठे यमाई पिंपरखेड जांबुत व आमदाबाद या ठिकाणी अवैधरित्या दारूभट्टी सुरू आहे तात्काळ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस पथकासह मिळालेल्या
गोपनीय माहितीच्या आधारे ८ ऑक्टोबर रोजी कवठे यमाई, पिंपरखेड, जांबुत व आमदाबाद ता. शिरूर, परिसरात तब्बल ४ ठिकाणी छापे टाकून दारू भट्टी व दारू बनवण्याचे रसायन जप्त केले व काही नष्टही केले. या कारवाईत १ लाख २३ हजार ७१५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री. संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार सुद्रिक, कळमकर व भवर या पथकाने केली आहे.