. शिरूर नगरपरिषद निवडणुकीचा प्रभाग निहाय आरक्षण जाहीर ...नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला
शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगर परिषदेचे १२ प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रांत अधिकारी पुनम अहिरे यांच्या उपस्थितीत चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले असून, अनेक प्रभागामध्ये कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर अनेक ठिकाणी कारभारी ऐवजी आता कारभारीण निवडणूक रिंगणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे त्यामुळे अनेक जण तिकडे चाचपणी करताना आपल्याला दिसणार आहे.
यावेळी शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी प्रितम पाटील, शिरूर नगरपरिषद अधीक्षक राहुल पिसाळ, पंकज काकड, चंद्रकांत पठारे, विनोद उबाळे उपस्थिती होते .
आजची आरक्षण सोडत शिरूर नगरपरिषद उद्योगपती रसिकलाल धारिवाल सभागृहात काढण्यात आली.
सोडतीनंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपणच आपले स्वतःचे, आई, पत्नी, भाऊ आपण प्रभागचे उमेदवार अशी घोषणा केलेले पोस्टर झळकताना दिसून आले... अनेकांनी गाण्यासह व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर रील व स्टेटस ठेवून धुमाकूळ घातला आहे.
आजची शिरूर नगरपरिषद आरक्षण सोडत नगरपरिषद सभागृहात पार पडली यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांचे हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले तर शहरातील नागरिक व अनेक इच्छुकांची गर्दी पहावयास मिळाली.
आरक्षण प्रसिद्ध ९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धः होणार असून या आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्याकडे सादर कराव्यात असेही सांगून ज्यांनी आरक्षणाबाबत हरकत किंवा सूचना केल्या आहेत त्यांना स्वतंत्रपणे सुनावणी साठी बोलावण्यात येणार आहे.
प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १
आरक्षण
अ)सर्वसाधारण महिला
ब)सर्वसाधारण
कामाठीपुरा मधील काही भाग, कैकाडी आळी, साळुंखे मळा, रम्यनगरी, प्रोफ़ेसर कॉलनी, ढोरआळी, कुंभार आळीचा काही भाग, मुंबई बाजारचा काही भाग, साईनगरचा काही भाग)
प्रभाग क्रमांक २
आरक्षण
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला )
ब)सर्वसाधारण
कुंभार आळी, कुरेशी मोहल्ला, मदारी वस्ती, इस्लामपुरा, हल्दी मोहल्ल्ला, बुरुड आळी, मुंबई बाजार
प्रभाग क्रमांक ३
आरक्षण
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी )
ब) सर्वसाधारण महिला
सोनार आळी, मारुती मंदीर परिसर, अष्टविनायक सोसा., खांडरे आळी, भाजीबाजार, जूना अंडे बाजार, फकीर मोहल्ला, लाटे आळी भाजी बाजार कढील भाग, सुभाष चौक, गेंदाबाई चौक)
प्रभाग क्रमांक ४
आरक्षण
अ)अनुसूचित जाती महिला
ब)सर्वसाधारण
सरदार पेठ मागील बाजू, मारुती आळी काही भाग, चर्च जवळील भाग, आंबेडकरनगर, कब्रस्तान, सुशिला पार्क, आदीनाथ नगर (खारा मळा) अमरधाम, पंचायत समिती कार्यालय परिसर, PWD कार्यालय परिसर, पांजर पोळ, भुजबळ मळा, ढोमे मळा, पाचर्णे मळा, घोडोबा मंदीर समोरील पाचर्णे वस्ती, सुरंजनगर, शिवाजीनगर, माईल सोसायटी
प्रभाग क्रमांक ५
आरक्षण
अ)सर्वसाधारण महिला
ब)सर्वसाधारण
महादेवनगर, संपूर्ण जोशी वाडी, विठ्ठल नगर, MSEB कॉलनी, पोलीस लाईन, तहसिल कार्यालय परिसर, अष्टविनायक ईमारत, स्टेट बॅन्क कॉलनीचा काही भाग, बायपास झोपडपट्टी
प्रभाग क्रमांक ६
आरक्षण
अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)
ब)सर्वसाधारण
PWD कॉलनी से बीजे कॉर्नर कॉलेज रोडने श्री. गिरे यांचे घरा पर्यंत ते बाजूच्या रस्त्याने पुणे नगरच बायपास रोड गणेश नगर पर्यंत, गणेश नगर ते मेडिकल कॉलेज होस्टेल (पुणे-नगर रस्ता) तेव गोडसे बिल्डींग ते इंद्रधनुष्य ईमारत ते दत्त मंदिर ते संपूर्ण बागवान नगर ते हॉटेल मार्बल इन ते बीजे कॉर्नर ते स्टेट बॅन्क ऑफ इंडीया (बागवाननगर,PWD वसाहत, जाधव मळा, बी जे कॉर्नर, गणेश नगर, संपूर्ण गुजरमळा, एसबीआय कॉलनीचा काही भाग)
प्रभाग क्रमांक ७
आरक्षण
अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी )
ब)सर्वसाधारण महिला
यशवंत कॉलनी, रयत शाळा, सैनिक सोसा., जिजामाता सोसा, शिवाजी सोसा., करंजूले वस्ती, गिता नगर, कुकडी वसाहत, रेव्हेन्यू कॉलनीचा काहीभाग, कोर्ट परिसर, वसंतराव नाईक नगर
प्रभाग क्रमांक ८
आरक्षण
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला )
ब)सर्वसाधारण
(डंबेनालाआडत बाजार, कापड बाजार, राम आळी, मारुती आळी, सरदार पेठ दक्षिण बाजू पुणे नगर रोड, रेव्हेन्यू कॉलनी काही भाग, शांती नगर, एस टी डेपो परिसर)
प्रभाग क्रमांक ९
आरक्षण
अ)अनुसूचित जाती
ब)सर्वसाधारण महिला
साईनगर, काची आळी, सय्यद बाबा नगर, संजय नगर, सिद्धार्थ नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती)
प्रभाग क्रमांक १०
आरक्षण
अ)अनुसूचित जाती महिला
ब)सर्वसाधारण
एम एस ई बी सर्व्हिस स्टेशन, नवीन मार्केट यार्ड, वाडा वसाहत, गोपाळ वस्ती, छत्रपती कॉलनी, इंदिरानगर, बीसी हौसिंग सोसायटी, नवीन नगरपरिषद प्रशासकीय ईमारत, → अग्निशमन केंद्र, इसवे नगर, पाबळ फाटा)
प्रभाग क्रमांक ११
आरक्षण
अ)अनुसूचित जमाती महिला
ब)सर्वसाधारण
कामाठी पुरा, एस टी कॉलनी, श्री हाईटस, आनंद सोसायटी, खिश्चन दफन भूमी परिसर, सर्टीफाईड स्कूल परिसर, पवार मळा, मंगलमूती नगर, गादीया मळा, पाषाण मळा, बायपास रोड, दत्त मंदीर परिसर, मिल्ल वस्ती, पारधी वस्ती, जलशुध्दीकरण केंद्राजवळील झोपडपट्टी, प्रितमप्रकाश नगर, मामाजीचा मळा)
प्रभाग क्रमांक १२
आरक्षण
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी )
ब)सर्वसाधारण महिला
संपुर्ण हुडको कॉलनी, बोरा कॉलेज, फार्मसी कॉलेज, बाफणा मळा, दिघे मळा, बोरा मळा, शिक्षक कॉलनी परिसर, साई ग्रार्डन परिसर, डायमंड प्लाझा सोसा. गोलेगांव रोड पश्चिमे कडील बाजू, घोडोबा मंदीर परिसर