शिरूर प्रतिनिधी
पुणे शिरूर अहिल्यानगर महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असून त्याला सर्वसामान्य नागरिक व वाहन चालक वृद्ध युवा सगळेच वैतागले आहेत त्यामुळे काल शिक्रापूर येथे काही ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले यात ८० वर्षाची माझी आमदार सूर्यकांत उर्फ काकासाहेब पलांडे यांनी भाग घेतला परंतु या आंदोलनात युवा गायब झाला होता त्यामुळे शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातील युवकांना आता सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्याचे काम सुरू असून 80 वर्षाचा वृद्ध रस्त्यावर युवा कुठे आहे?अशा आशयाची बॅनर सोशल मीडियावर झळकु लागले आहे.
८० वर्षाचे माजी आमदार काकासाहेब पलांडे शिक्रापूर रोड वरच्या ट्राफीक साठी रस्त्यावर आले. पण शिक्रापुर परीसरातील हजारो संख्येने युवा कुठे आहे ??
युवा ऊज्जैन महाकाल यात्रा काढतोय.
युवा बैलपोळ्या ला डीजे लावतोय.
युवा गणपती आणि नवरात्रात ढोल बडवतोय. युवा १२ महीने राजकारण करतोय. युवा रोजगार मागत नाही. युवा व्यवस्थेला भिडत नाही. युवा भाई लोकांच्या पुढ पुढ करतो अशा आशयाचे बॅनर सोशल मीडियावर झळकून तरुणाईला ट्रोलिंग करण्याचे काम सुरू आहे.
पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, कारेगाव या प्रमुख गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती पुणे ते शिरूर ६६ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तीन ते साडेतीन तास वेळ लागत आहे.
तर सकाळी दुपारी सायंकाळी संध्याकाळी मध्यरात्री अशा प्रत्येक वेळेस या गावांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते कधी कधी तर वाहतूक कोंडीतून जाताना एका गावातच अर्धा ते एकेक तास लागतो दोन दोन तास लागतात यावेळेस अनेक वृद्ध नागरिकांची तसेच आजारी असणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तर युवक महिला पुरुष या सर्वांना त्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.
याच्या निषेधार्थ काल दिनांक 6 ऑक्टोबर रोजी शिक्रापूर येथे या भागातील प्रमुख नागरिकांनी या रस्त्यावरील वाहतूक कोंडीला त्रासून रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळेस या आंदोलनात वृद्ध व मतदांवरील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती परंतु या आंदोलनामध्ये युवक कुठे दिसत नसल्याने ज्या युवकांनी याबद्दल आवाज उठवायला पाहिजे ते युवक आज काय करतात आंदोलनात सहभागी का नाही हा विचार करण्याचा प्रश्न होता परंतु कोणा एका महाभागाला हे लक्षात आले आणि त्याने तरुणांची आजची परिस्थिती चार ओळीत नागरिकांपुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणली ही परिस्थिती खरी असली तरी याबाबत युवक मात्र गप्प आहेत मोठ्या प्रमाणात युवकांचा देश असणारा हिंदुस्तान मात्र युवक वर्ग गप्पा असल्याने सर्व सहन करत असल्याचे चित्र या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसत आहे.