भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या स्पर्धा कौतुकास्पद - उद्योजक प्रकाश धारिवाल यांचे मत
गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
शिरूर प्रतिनिधी
गणेशोत्सव व गौरीपूजन सण समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम करतात. भूमिपुत्र प्रतिष्ठानने घेतलेल्या स्पर्धा कौतुकास्पद असल्याचे मत शिरूरचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी व्यक्त केले.
गणशोत्सवात येथील भूमिपुत्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण धारिवाल यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पारितोषिक वितरण समारंभास राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, पुणे विभागीय कार्यालयाचे सहआयुक्त संजीव पलांडे, शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत कानिफनाथ शिवशंकर परदेशी, सुनीता सुधीर कडेकर व योग मदन वाघमारे यांनी अनुक्रमे 'गौरी, गणपती आणि सेल्फी विथ बप्पा' या
शिरूर येथील भूमिपुत्र प्रतिष्ठानने घेतलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.
तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते 'गणराया करंडक २०२५' ने सन्मानित करण्यात आले.
निकाल पुढीलप्रमाणे सजावट प्रथम गौरी सुनीता सुधीर श्रद्धा व गौरी कडेकर, द्वितीय कडेकर, तृतीय आकांक्षा अनिल वळे, चतुर्थ छाया सचिन वाखारे.
गणपती सजावट प्रथम कानिफनाथ शिवशंकर परदेशी, द्वितीय श्रद्धा स्वप्निल पोटघन,
तृतीय सविता विजयकुमार सोनवणे, चतुर्थ रोनित निलेश मैड.
सेल्फी विथ बाप्पा प्रथम
योग मदन वाघमारे, द्वितीय प्रसाद रमेश वाळुंज, तृतीय गौरांश प्रवीण वराडे, चतुर्थ अंकिता महेश बिबवे
या स्पर्धेसाठी श्रीमती सुरेखा रणदिवे, रमेश जाधव, सतीश धुमाळ, स्वाती थोरात, तुकाराम खोले यांनी परीक्षण केले. स्पर्धेचे आयोजक भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. परवेज बागवान, स्नेहा लंघे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश जामदार यांनी आभार मानले.