शिरूर शहरातील विकास कामासाठी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या निधीतून 22 कोटी रुपये... शिरूर शहराचा ऐतिहासिक शहर म्हणून नावलौकिक होणार - ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आमदार शिरूर
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहर तालुक्यातील ऐतिहासिक गाव असून या गावाला ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे या गावाचा विकास करणे माझे कर्तव्य असून शिरूर शहर राज्याच्या जिल्ह्याच्या नकाशावर एक विकसित शहर म्हणून नावारूपात आणण्याची माझी जबाबदारी असल्याची शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी सांगून पहिल्या टप्प्यात साडेबावीस कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ करताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार माऊली कटके यांच्या निधीतून शिरूर शहरातील 22 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार कटके बोलत होते.
यावेळी शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शरद कालेवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक राजेंद्र गावडे, सुनील जाधव, माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे,व मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार माऊली कटके म्हणाले शिरूर शहरा तालुका हवेली तालुक्यासाठी जो निधी लागेल तो महायुती पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असून पाबळ फाटा येथील 17 ते 18 एकर जागा पुन्हा नगर परिषदेत मिळेल यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक असून लवकरच त्या फाईलवर सही होऊन ही जागा पुन्हा नगर परिषदेत प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी दिला, तर नगर परिषदेच्या पंपिंग स्टेशन साठी व पाणीपुरवठ्यासाठी जो निधी लागल त्याची तरतूद आजच्या विकास कामांमध्ये केली असल्याचेही आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शिरूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल म्हणाले की शिरूर शहराचा विकास होत असताना त्या विकासाबरोबर मी आहे मला त्यासाठी आमंत्रित केले तर मी शहराचा विकास व्हावा यासाठी सर्वांच्या बरोबर असतो परंतु मी कोणत्या पक्षाचा नसून मी कुठल्याही पक्षात नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. तर शिरूर नगर परिषदेमध्ये काम करत असताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे तर आत्ताचे नवीन आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर शहरासाठी साडेबावीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यांच्याही नगरपरिषद व संपूर्ण शिरूर शहराच्या नागरिकांच्या वतीने आभार मानतो असे सांगून तुम्ही शहरासाठी जो निधी दिला तो कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी खासदार शिवाजीरावआढळराव पाटील म्हणाले शिरूर शहराच्या विकासासाठी मी खासदार असताना व नसतानाही शहराच्या विकासासाठी मोठा निधी दिला असून शहराची पाण्याचा प्रश्न सुटणसाठी नवीन 72 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आली असून ही योजना लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास देऊन शिरूर शहरातील नगरपरिषदेची ऐतिहासिक मराठी शाळा क्रमांक एक करिता ह मोठा निधी दिला असून यासाठी लागणारा आणखी निधी माळीची सरकारच्या वतीने लवकरच देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिरूर शहरातील विकासासाठी माजी नगराध्यक्ष उद्योगपती स्वर्गीय रसिकलालजी धारीवाल माजी नगराध्यक्ष शाहिदखान पठाण यांचे मोठे योगदान असल्याचे असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जाकिर खान पठाण यांनी सांगितले तर शिरूर येथील पाचकंदील चौकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, यास अनेक नेत्यांच्या सभा या चौकात झाल्या असून हा चौक ऐतिहासिक चौक म्हणून ओळखला जावा यासाठी शहरातील विकास कामांमध्ये हा चौक ऐतिहासिक चौक म्हणून त्याची ओळख होणार आहे असेही सांगितले.
यावेळी शिरूर शहरातील अहिल्यानगर कडून येणाऱ्या चौकात व पुण्यावरून शिरूर शहरात येणाऱ्या मार्गावरील चौकात स्वागत कमानीचा व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आला तर शहरातील पाच कंदील चौक याची सुशोभीकरण करून हा चौक ऐतिहासिक चव म्हणून ओळखला जाईल याचीही चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.
सूत्र संचालन रावसाहेब चक्रे यांनी तर आभार विनोद भालेराव यांनी मानले.