शिरूर येथील लक्ष्मी माता मंदिर श्री महादेव मंदिर शहरातील प्रमुख जागृत देवस्थान - सुरेखा रणदिवे
शिरूर दिनांक प्रतिनिधी
सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत रणदिवे यांनी जागृत श्री लक्ष्मी माता व श्री महादेव मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि शिरूर शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या या मंदिराला नवचैतन्य मिळाले असून दरवर्षी या ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा करून रास दांडिया कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे व स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यातून स्पर्धकांना आपल्या कला गुणांना वाव मिळत असून, या पुढील काळात या स्पर्धा व उत्सव मोठ्या प्रमाणात होईल असा आशावाद श्री लक्ष्मी माता व श्री महादेव मंदिराच्या कार्याध्यक्ष व शिक्षिका सुरेखा रणदिवे यांनी व्यक्त केला.
नवरात्रीच्या नऊ दिवस देवीचा आपल्या सर्वांमध्ये वास असतो या देवीच्या जागरणाने समाजातील महिलांना प्रोत्साहन मिळत असून रास गरबा दांडिया बरोबर विविध स्पर्धा घेतल्याने महिलांचा उत्साह वाढत असतो असे मत श्री लक्ष्मी माता मंदिर व श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या कार्याध्यक्ष सुरेखा हनुमंत रणदिवे यांनी व्यक्त केले.
शिरूर येथील जागृत देवस्थान श्री लक्ष्मी माता मंदिर व श्री महादेव मंदिर यांच्यावतीने नवरात्री निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच पार पडला.
यावेळी रांगोळी आर्टिस्ट राणीताई बनकर, डॉक्टर सविता सोनवणे, एम ई पी एल कंपनीचे प्लांट हेड निखिल मराठे, उद्योजक सतीश धावडे, विद्याधाम शिरूरच्या शिक्षिका माहेश्वरी माने, डॉ. संजय बिरादार, मंडळाचे ज्यष्ठ मार्गदर्शन रंजना गवळी, सामाजिक कार्यकर्त्यास संध्या औटी, रुपाली चोपडे, भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे, संतोष थेऊरकर,श्री लक्ष्मी माता व श्री महादेव मंदिराचे अध्यक्ष भूषण रणदिवे, विश्वस्त दिनेश कळमकर, मुकुंद ढोबळे, शुभम पुजारी, पितांबर चोपडे, संतोष मिरजकर, रौनक सतीजा,अर्चना धावडे,गीताराणी आढाव , प्रताप कुरुमकर उत्कर्ष करपे, योगेश पवार, विराज आढाव , श्री गवळी, संकेत चोपडा उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक संग्राम सोमनाथ पठाडे, द्वितीय क्रमांक प्रज्ञा बाळासाहेब रायभोळे, तृतीय क्रमांक सार्थक गणेश जाधव,
फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान गट
प्रथम क्रमांक स्वरा प्रज्वल चौधरी, द्वितीय क्रमांक जयश्री प्रज्वल चौधरी, तृतीय क्रमांक प्रतिज्ञा रामदास आल्हाट
फॅन्सी ड्रेस स्पर्धा मध्यम गट
प्रथम क्रमांक शुभ्रा अशोक आढाव, द्वितीय क्रमांक हर्षदा पितांबर चोपडे, तृतीय क्रमांक प्रतिज्ञा रामदास आल्हाट
फॅन्सी ड्रेस स्पर्धा खुला गट
प्रथम क्रमांक कार्तिकी पंकज रोटे, द्वितीय क्रमांक धनश्री शरदचंद्र गवळी, तृतीय क्रमांक ज्योती सुदाम खोडदे
रांगोळी स्पर्धा लहान गट
प्रथम क्रमांक रक्षोग्नी बाळासाहेब टोणगे, द्वितीय क्रमांक स्वरा सचिन अहिरे, तृतय क्रमांक सृष्टी/श्रद्धा रामलिंग कामनुर, तृतीय क्रमांक दर्शनी भाऊसाहेब झांबरे
चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुरेखा रणदिवे मॅडम, फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिक्षिका साधना शितोळे व रोहिणी जावळे, रांगोळी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रांगोळी आर्टिस्ट राणीताई बनकर, पाककृती स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रौनक सतीजा व निखिल मराठे, डॉक्टर सविता सोनवणे यांनी काम पाहिले.
रांगोळी स्पर्धा खुलागट
प्रथम क्रमांक ऋतुजा रोहन चौधरी, द्वितीय क्रमांक भावना भाऊसाहेब बांदल, तृतीय क्रमांक रेश्मा रितेश खुडे, उत्तेजन नीतू सुरेश जैस्वाल
पाककृती स्पर्धा
प्रथम क्रमांक सुरेखा मोहन इंगळे, द्वितीय क्रमांक छाया रामदास आल्हाट, तृतीय क्रमांक स्वाती नंदकुमार पाटील, उत्तेजनार्थ अर्चना बाळासाहेब मांडगे
खेळ पैठणीचा कार्यक्रम
मानाच्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी सुनीता टोणगे , दोन नंबर पैठणीच्या मानकरी संध्या औटी आणि तीन नंबर पैठणीच्या मानकरी रेश्मा खुडे
खेळ पैठणीचा यासाठी उद्योजक संतोष थेऊरकर यांनी सहकार्य केले.
कुठलीही स्पर्धा असली की त्यामध्ये यश अपयश असते अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केल्यास यश मिळत असते असे प्रतिपादन श्रीगोंदा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना धावडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत कुटे, स्वागत मुकुंद ढोबळे, प्रास्ताविक भूषण रणदिवे तर आभार संतोष मिरजकर यांनी मानले