शिरूर नगरपरिषद नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव.... तर ऑक्टोबरला प्रभाग निहाय आरक्षण सोडत होणार....

9 Star News
0

 शिरूर नगरपरिषद नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव.... तर ऑक्टोबरला प्रभाग निहाय आरक्षण सोडत होणार....


शिरूर प्रतिनिधी 

            यावर्षी होणाऱ्या शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नागराध्यक्षपदाची माळ यंदा ओ बी सी महिला यासाठी राखीव झाल्याने शिरूर नगर परिषदेला या पंचवार्षिक मध्ये महिलाराज येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

       शिरूर नगरपरिषद करीता सलग तीन पंचवार्षिक महिला राज आल्याने अनेकांची निराशा.

      तर नगरपरिषद प्रभाग निहाय आरक्षण दिनांक ८ ऑक्टोबर २५ रोजी होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.

          आज नुकतीच मुंबई येथे राज्यातील नगरपरिषद नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत झाली त्या आरक्षण सोडतीमध्ये शिरूर नगरपरिषद ही ओबीसी महिलेसाठी राखीव झाली आहे.

         आता शिरूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका नसल्याने प्रशासन राज्य होते परंतु लवकरच राज्य शासनाने व निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केले असून आज नागराध्यक्षपदाची आरक्षण सोडत झाली आहे तर दिनांक 8 ऑक्टोबर रोजी नगरपरिषद प्रभाग आरक्षण सोडत होणार आहे. 

          पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची समजल्या जाणारे शिरूर नगरपरिषद याच्यावर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांचे वर्चस्व राहिले आहे. यंदाची निवडणूक ही शिरूर विकास आघाडीच्या माध्यमातून ते लढवतीलच परंतु मोठ्या प्रमाणात शहरातील प्रभाग रचनेमध्ये वाढ झाली आहे मागील पंचवार्षिक मध्ये 21 नगरसेवक होते व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष असे होते. परंतु यंदा नगरसेवक पदांमध्ये तीन ने वाढ झाली असून ती संख्या आता 24 झाली आहे तर नगराध्यक्ष हा मतदारांमधून निवडायचा आहे त्यामुळे शिरूर नगर परिषदेमध्ये एकूण सदस्य नगराध्यक्ष म्हणून 25 ची संख्या होणार आहे.  

           आता शिरूर शहरामध्ये नगराध्यक्ष पदाची सोडत आज झाली असून त्यात ओबीसी महिला या प्रवर्गाला नगराध्यक्षाची संधी मिळणार आहे त्यासाठी शहरातून अनेक इच्छुकांची नावे समोर येऊ लागली आहे. मराठा ओबीसी आरक्षणामध्ये अनेकांनी ओबीसी जातीचे दाखले काढल्याने आता या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष पदासाठी चुरस होईल.

         शिरूर शहरातील सर्वच भागात आता निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. इच्छुकांची लगीन घाई सुरू झाली आहे. त्यामुळे मधल्या चार वर्षापासून इच्छुक असलेले अनेक जण आता आपापल्या प्रभागामध्ये दिसू लागले आहे त्यामुळे यंदाची शिरूर नगर परिषद निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडेल असे चित्र निर्माण झाले आहे.

         शिरूर नगरपरिषद प्रभाग निहाय आरक्षण सोडत दिनांक ८ ऑक्टोबर रोजी शिरूर नगरपरिषद सभागृहामध्ये पार पडणार आहे. तरी या आरक्षण साठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे.

  त्यात माजी नगराध्यक्ष सुवर्णाताई लोळगे, माजी नगरसेवक अलकाताई खांडरे, माजी नगराध्यक्ष सुनीता कालेवार, माजी नगरसेवक मनीषा कालेवार, रोहिणी बनकर , ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, मनीषा गावडे, अलकाताई सरोदे, सुवर्णा लटांबळे, सोनिया दसगुडे, सुरेखा शितोळे , अंजली थोरात, यासह अनेक नवीन चेहरे या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी आपल्याला समोर आलेले दिसतील.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!