कासारी फाटा येथे कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात,22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावच्या हद्दीत
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कासारी फाटा(कोंढापुरी) ता.शिरूर येथे कंटेनरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
या अपघातात गायत्री गजानन इंगळे (वय २२ वर्ष,रा. शिक्रापूर, ) या तरुणीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तरुणी आपल्या अॅक्टीव्हा दुचाकी क्रमांक एम.एच. १२ आर.इ. ४२९९ वरून कुरीयर घेण्यासाठी कासारी फाटा येथे गेली होती. रस्ता क्रॉस करण्यासाठी ती डिव्हायडरमध्ये थांबलेली असताना, कंटेनर (एम.एच. ४६ बी.एफ. ९२४०) हा कंटेनर भरधाव वेगात येऊन तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या गायत्रीला तातडीने ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
अपघात करणाऱ्या कंटेनरचा चालक राजन कुमार गौतम (रा. कुंदवा उर्फ दिलीपनगर, कसया, कुशीनगर, उत्तर प्रदेश) याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निष्काळजीपणे वाहन चालवले असल्याचे फिर्यादी गौतम श्रीराम इंगळे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.