पाबळ मधील बलात्कार प्रकरणी वीस वर्षे सक्तमजुरी
अल्पवयीन युवतीवर फिरण्याच्या बहाण्याने बलात्कार प्रकरण
शिरूर
( प्रतिनिधी ) पाबळ ता. शिरुर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन युवतीला फिरण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याने युवती गरोदर राहिल्याने अत्याचाराचा प्रकार उघडकीस आलेला असता सदर गुन्ह्यातील महेश दत्तात्रय गोरडे या आरोपीला न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
पाबळ ता. शिरुर येथील अल्पवयीन युवतीला महेश गोरडे याने त्याच्या जवळील कार मध्ये फिरायला घेऊन जाण्याचा बहाण्याने घेऊन जाऊन युवतीवर जबरदस्तीने शारीरिक संबध करत तिला धमकी देत पुन्हा घरी आणून सोडले, त्यांनतर युवती गरोदर राहिला तर घरातील व शेजारील महिलांना संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने सर्व प्रकार सांगितला, दरम्यान युवती गरोदर असल्याचे समोर आल्याने पिडीत युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी महेश दत्तात्रय गोरडे वय २५ वर्षे रा. पिंपळवंडी पाबळ ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार, बलात्कार सह आदी गुन्हे दाखल करत तत्कालीन सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे यांनी त्याला अटक केली, त्यांनतर आरोपीबाबत योग्य दोषारोपपत्र न्यायलयात सादर केले, तर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयात आरोपी महेश गोरडे विरोधात खटला चालवत असताना सरकारी अभियोक्ता म्हणून नितीन कोंघे यांनी काम पाहिले असताना प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, कोर्ट अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन भागवत, पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, तर समन्स व वॉरंट अंमलदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक पंडीत मांजरे व पोलीस शिपाई प्रफुल्ल सुतार यांनी काम पाहत न्यायालयात योग्य पुरावे व साक्षीदार सादर केले असता न्यायालयाने तब्बल अकरा साक्षीदार तपासत सदर गुन्ह्यात महेश दत्तात्रय गोरडे वय २५ वर्षे रा. पिंपळवंडी पाबळ ता. शिरुर जि. पुणे याला दोषी ठरवत अत्याचार प्रकरणात दोषी ठरवत वीस वर्षे सक्तमजुरी व पंचवीस हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे
.


