शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात 72 वर्ष वृद्ध आजीचा मृत्यू

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात 72 वर्ष आजीचा मृत्यू


शिरूर प्रतिनिधी 

       जांबुत ता.शिरूर थोरातवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात ७२ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आठ दिवसापूर्वीच एका पाच वर्षीय चिमुरळीचा बिबट्याने मृत्यू घेतला होता त्यानंतर ही घटना घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्र शासन आणि वन विभाग यांना माणसे मारायची आहेत का?असा सवाल नागरिक करीत आहे.

    या बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई रंगनाथ जाधव या ७२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

     शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा हौदोस सुरूच असून आठ दिवसापूर्वी पिंपरखेड (ता.शिरूर) येथील पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे हिच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज बुधवार दिनांक २२ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जांबुत थोरातवस्ती येथे लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या भागुबाई रंगनाथ जाधव या ७२ वर्षीय. महिलेवर घराबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लाकरून महिलेला उसाच्या शेतात ओढून घेऊन गेला.

त्या बाहेरून घरात न आल्याने त्यांच्या मुलाने पाहिले असता त्यांना रक्त दिसल्याने त्यांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून शोधाशोध केली ही घटना कळताच नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह घरापासून पाचशे मीटर लांब उसाच्या शेतात सापडला. वृद्ध महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

       गेल्या आठ दिवसात बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची ही दुसरी घटना असून परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवन्या बोंबे मृत्यू प्रकरणानंतर या भागात शंभर पिंजरे लावण्यात येतील असे निर्देश जुन्नरचे उपवनसंरक्षक संतोष खाडे यांनी दिले होते. 

      जांबुत, पिंपरखेड आणि परिसरात बिबट्यांची संख्या ही 300 च्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून वनविभागाने योग्य वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती अशा संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. जांबुत आणि परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य ठार होण्याची ही आठवी घटना असून या आधीच्या काळात वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.

मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीला मात्र शेतकऱ्यांच्या मागणीला वनविभागाकडून थेट केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येते. शिवन्या बोंबे हिचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरखेड परिसरात केवळ दहा पिंजरे लावण्यात आले होते.सध्याचे स्थितीत फक्त सात पिंजरे कार्यान्वित असून बिबट्यांची संख्या पाहता या भागात अधिकचे पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी वारंवार परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. मात्र ठोस उपाययोजना करण्यास वनविभागाची अकुशलता दिसून आल्याने हे बळी गेले आहेत अशा संतप्त भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

      एका पालकाने संतापाने सांगितले, मुलं खेळायला बाहेर गेली की मन थरथरतं. दिवसा बिबट्यांचा वावर आहे, रात्री तर घराबाहेर पडणं अशक्य झालं आहे. सरकार आणि वन विभाग झोपले आहेत का? ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारीनंतरही वन विभागाकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. काही ठिकाणी पिंजरे लावले असले तरी बिबट्यांचा वास धरता आला नाही. केवळ बैठका, पंचनामे आणि कागदोपत्रीवर मर्यादित हालचाल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!