शिरूर शहरातही वोट चोरीचा प्रकार उघडीस... प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष... सामाजिक कार्यकर्त्या महिलेचे व कुटुंबाचे मतदान प्रभाग बदलण्याचा प्रकार
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषद निवडणूक प्रारूप मतदार यादी आपली नावे प्रभाग बदलून गेली असतील तर हरकती व सूचना घेण्यासाठी अर्ज करून आज्ञाताने अनेकांची नावे व आधार कार्ड वरील पत्ते बदलून प्रभाग वेगळा दाखवण्याची गंभीर घटना घडली असून याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून याचा तपास पोलीस खात्याकडून नगरपरिषदेने करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. हा वोट चोरीचा प्रयत्न असल्याची चर्चा शिरूर शहरांमध्ये आहे.
शिरूर शहरातील सुभाष चौक येथील अनेक नागरिकांच्या व सामाजिक कार्यकर्ता शशिकलाताई काळे यांच्या कुटुंबांचेही नावे व प्रभाग बदलण्याचा प्रयत्न केल्या असल्याने हा प्रकार उघडीस झाला आहे.
शिरूर नगरपरिषदेची निवडणूक करिता प्रारूप प्रारूप मतदार यादी जाहीर झाली होती त्यावर हरकती व सूचना किंवा आपली नावे आपले प्रभाग बदलून गेली असतील तर पुन्हा आपल्या प्रभागात आणण्यासाठी नगर परिषदेनेच्या वतीने दिनांक 17 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना मागितल्या होत्या. परंतु शिरूर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या व त्यांच्या अनेक प्रभागातील लोकांचे ते राहत असलेले पत्ते बदलून त्यांच्या नावाचे आधार कार्ड घेऊन आधार कार्ड वरील पत्ते बदलू यावर आम्ही या वार्डामध्ये नसून दुसऱ्या वार्डात आहोत अशा हरकती व सूचना घेतले आहेत.
याबाबत या हरकतीवर सूचनांची शहनशा करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने नेमण्यात आलेले बी एल ओ हे चौकशीसाठी आले असता संबंधित महिलेच्या कुटुंबातील व अनेक प्रभागामधील नागरिकांना आपल्या नावाचे खोटे पत्ते तयार केलेले आधार कार्ड तयार केल्याचे लक्षात आले. कारण हरकती व सूचना घेणाऱ्या अर्जावर त्यांच्या डुबलीकेट सह्या व डुबलीकेट आधार कार्ड जोडलेले होते. हे पाहून या सामाजिक कार्यकर्ते आश्चर्यचकित झाल्या त्यांनी बीएलओ यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी याबाबत हरकती व सूचना आल्या असून आम्ही केवळ हे मतदार नक्की कुठल्या प्रभागामध्ये आहेत याची शहनशा करीत आहोत. असे सांगून त्यांचे हरकती व सूचना बाबत विचारणा करून त्याबाबत योग्य ते अभिप्राय नोंदवला आहे.
परंतु या महिला सामाजिक कार्यकर्त्या या शिरूर शहरातील प्रभाग क्रमांक तीन सुभाष चौक येथे राहत असून, त्यांची संपूर्ण कुटुंब गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहत आहे परंतु त्यांच्या नावाची हरकती व सूचना घेऊन ही नावे प्रभाग क्रमांक दोन मध्ये टाकण्याच्या प्रयत्न अज्ञात आणि केला आहे. त्यांचे नाव प्रभाग क्रमांक 2 मध्ये टाकून तेथे पुरावा म्हणून आधार कार्ड जोडले आहे . हे आधार कार्ड पुढील बरोबर असून पाठीमागील पत्ता हा चुकीचा खाडाखोड असल्याचा दिसून आले आहे.
याबाबत शिरूर नगर परिषदेने खातर जमा करणे गरजेचे आहे व ज्या कोणी हे कृत्य केले आहे त्याची चौकशी करावी कारण शिरूर नगर परिषदेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. व हा अर्ज ज्या दिवशी आला आहे त्यादिवशीच्या हरकती घेणाऱ्या लोकांचे फोटो व्हिडिओ पाहून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मी शिरूर शहरातील सुभाष चौक येथील प्रभाग क्रमांक तीन येथे राहत असून हा आमचा पत्ता आहे.या ठिकाणी आम्ही गेली 50 वर्ष पासून जास्त काळ राहत आहे आजही राहत आहे परंतु अज्ञाताने आमच्या नावाची डुबलीकेट आधार कार्ड तयार करून त्यावरील पत्ता बदलून आम्ही तीन नंबर प्रभागांमध्ये असताना आमचे हरकतीस व सूचना घेऊन अर्ज व आधार कार्ड ची झेरॉक्स जोडून आम्ही प्रभाग क्रमांक दोन व आमचा पत्ता ढोरआळी शिरूर असा लिहिला आहे. आमच्या प्रभागांमधील असे अनेक लोकांच्या पत्तेवर डुबलीकेट आधार कार्ड तयार करून पत्ते बदलण्याची काम केले आहे. आमचे आधार कार्ड संबंधित अज्ञात नागरिकाला कसे मिळाले याची चौकशी होणे गरजेचे आहे.याबाबत शिरूर नगर परिषदेने सखोल चौकशी करून अज्ञात व्यक्ती यांचा शोध लावून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवावा अशी मागणी करण्यात आली आहे. या हरकती व सूचना 17 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या आहेत.
शशिकला काळे, सामजिक कार्यकर्त्या शिरूर
अशाप्रकारे अर्ज देऊन चक्क डुबलीकेट सही व आधार कार्ड वरील पत्ता बदलण्याचा गंभीर प्रकार उघडीस




