वृद्ध महिला'पुरुष यांना सेवाभावातून मोफत देवदर्शन प्रभाग क्रमांक पाचचे सामजिक कार्यकर्ते संतोष थेऊरकरांच्या उपक्रमाचे होते कौतुक'
शिरूर प्रतिनिधी
वृद्ध महिला पुरुष यांना सामाजिक जाण व सेवा भावनेतून पंढरपूर, तुळजापूर व अक्कलकोट मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करून आदर्श घालून देणारे प्रभाग क्रमांक पाच मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष थेऊरकर यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आणि सहलीत आलेल्या वृद्ध, महिला पुरुष यांची मने जिंकली आहे.
लष्करातून निवृत्त झालेले कॅप्टन प्रभाकर थेऊरकर यांनी आयुष्यभर देशसेवेतून सेवाभाव जोपासला. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून संतोष थेऊरकर यांनी तरुणपणातच समाजासाठी कार्य करण्याचा ध्यास घेतला आहे. "आपला परिसर म्हणजेच आपले कुटुंब" या भावनेतून त्यांनी या देवदर्शन यात्रेचा संकल्प केला.
मागील पंधरवड्यात आयोजित पहिल्या यात्रेत दीडशेहून अधिक नागरिकांना वातानुकूलित बसमधून पंढरपूर, तुळजापूर व अक्कलकोट देवदर्शन घडवण्यात आले. प्रवासादरम्यान नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा देण्याची जबाबदारी थेऊरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली. प्रवास सुरू झाल्यापासून ते शिरूरला परत येईपर्यंत सर्व भाविकांची काळजी घेण्यात आली.
या काळात मिनरल वॉटर, नाश्ता, रुचकर भोजन, आरोग्याची सोय आदी सेवा भाविकांना उपलब्ध होत्या. स्वतःच्या कौटुंबिक सहलीतही इतक्या सेवा मिळत नाहीत, असे समाधान यात्रेत सहभागी झालेल्या महिलावर्गाने व्यक्त केले.
. दुसऱ्या यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात अडीचशेहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष व सनदी अधिकारी किशोरराजे निंबाळकर, माजी नगरसेवक पै. अशोक पवार, ह. भ. प. रासकर महाराज, ह. भ. प. जनाबाई गायकवाड महाराज, कॅप्टन प्रभाकर थेऊरकर, पत्रकार रावसाहेब चक्रे, दादा भुजबळ, नवनाथ फरगडे, शेखर दळवी, प्रवीण आढाव सर, तसेच स्टेट बँक कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक दिगंबर गायकवाड व महेश दांडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेचा शुभारंभ झाला.
पोपट शेलार तालुकाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
दुसऱ्या यात्रेतही भाविकांना पहिल्या अनुभवाप्रमाणेच सेवाभाव जाणवला. प्रत्येक गरज वेळेवर पूर्ण करण्यात आली. नाश्ता, जेवण, पाणी यासह आदरातिथ्याच्या सर्व सेवा सतत उपलब्ध होत्या. परिणामी सर्व भाविक भारावून गेले. या यात्रेविषयी नागरिकांनी मन:पूर्वक समाधान व्यक्त करत संतोष थेऊरकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
केवळ यात्रेपुरतेच नव्हे, तर प्रभागातील कोणत्याही समस्येच्या वेळी थेऊरकर तत्परतेने उभे राहतात, असा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला. "लोकप्रतिनिधी हा असा असावा" अशी अपेक्षा त्यांनी या वेळी मांडली.
या यात्रेत संतोष थेऊरकर यांच्या मित्रपरिवारातील डॉ. अमित गायकवाड, संजय बाचकर, राहुल लोंढे, योगेश पवार, अक्षय भवर, शिवम गोरे, प्रथमेश सुतार, प्रसन्ना मैड, आशिष थेऊरकर तसेच शिवरत्न प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले व सहकार्य केले.
सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांसाठी दाखवलेला सेवाभाव सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची खरी इच्छा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये नवा विश्वास व समाधान निर्माण होत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे.


