शिरूर प्रतिनिधी
गणेशोत्सवनिमित्त भूमिपुत्र प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांचे हस्ते शनिवारी (ता ०४) रोजी पार पडणार असल्याची माहिती भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी दिली आहे.
शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते आणि उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या समारंभास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर,पुणे विभागीय कार्यालयाचे सहआयुक्त संजीव पलांडे,शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,जुन्नर चे तहसीलदार डॉ सुनील शेळके,पोलिस निरीक्षक संदेश केंजळे,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
येथील राजभोग बँक्वेट हॉल मध्ये दुपारी ४.०० वाजता हा कार्यक्रम होणार असून सर्व स्पर्धकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भूमिपुत्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केले आहे