शिरूरचा आयुष गाडीलकर पोलिसांनी सुखरूप केला पालकांच्या स्वाधीन
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील निर्माण प्लाझा येथून बेपत्ता झालेला आयुष गाडीलकर या शाळकरी मुलास दोन तासाच्या आत शिरूर पोलिस स्टेशन तपास पथकाने शोधून सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
मुलगा मिळताच पालकांना गहिवरून आले तर
पोलिसांचे या कामगिरीचे मुलाचे पालक व नागरिक यांनी कौतुक केले आहे.
आयुष गाडीलकर वय १४ वर्ष रा जोशी वाडी शिरूर हा आज सकाळी ९ वाजता पळसकर क्लास,निर्माण प्लाज़ा शिरूर येथून क्लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला असता तो घरी आला नसल्याने पालकांनी याबाबत शिरूर पोलिस स्टेशन गाठले. याची गंभीर दखल घेत शिरूर पोलिस यांनी सोशल मीडियावर आयुष गाडीलकर बेपत्ता झाला असून त्याची माहिती मिळाल्यास शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.
तर शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल निखिल रावडे, पोलिस कॉन्स्टेबल नितेश थोरात यांनी निर्माण प्लाझा ते मुलगा रहात असलेले व इतर ठिकाणचे पंचवीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यात आयुष घरापर्यंत आला असल्याचे दिसले नंतर तो घरी पोहोचला नव्हता त्यानंतर इतर सीसीटीव्ही तपासले असता तो एका प्रवासी वाहनात बसून गेल्याचे दिसले त्याचा तपास करत तो आपल्या मूळगावी गेल्याचे दिसले तेथून पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतले व शिरूर पोलिस स्टेशन येथे आणून पालकांच्या स्वाधीन केले.
शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल निखिल रावडे, नितेश थोरात यांनी सलग दोन तास तपास करून हरवलेल्या मुलाचा शोध लावल्या बद्दल शिरूर पोलिसांचे पालकांनी व नागरिकांनी कौतुक केले.