शिरूरचे जागृत श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी युवा उद्योजक आदित्यशेठ धारिवाल यांची निवड
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहर व पंचक्रोशीचे जागृत देवस्थान श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी दानशूर युवा उद्योजक आदित्यचे धारिवाल यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र नुकतेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे.
शिरूर शहरातील व संपूर्ण राज्यातील एक जागृत देवस्थान लाखो भाविक या देवस्थानचे भक्त आहे. या जागृत देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत युवा उद्योजक आदित्यशेठ धारीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली.
आज या निवडीचे पत्र रामलिंग देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल, सचिव तुळशीराम परदेशी,खजिनदार पोपटराव दसगुडे, विश्वस्त वाल्मीकराव कुरुंदळे, बलदेवसिंग परदेशी, रावसाहेब पाटील, नामदेवराव घावटे, जगन्नाथ पाचर्णे, बबनराव कर्डिले उपस्थित होते.
उद्योगपती स्वर्गीय रसिकभाऊ धारिवाल यांचा वारसा समर्थपणे चालवणारे उद्योगपती प्रकाशेठ धारिवाल आणि त्त्यापुढे जाऊन आपल्या सामाजिक कार्यामुळे एक पाउल पुढे टाकणारे त्यांचे चिरंजीव युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या या निवडीमुळे शिरूर शहरात व पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून,त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिरूर पंचक्रोशी चे जागृत देवस्थान श्री रामलिंग महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदी माझी निवड केल्याबद्दल सर्व विश्वस्त मंडळाचे मी आभार मानतो. आमच्या कुटुंबाचे आराध्य दैवत श्री रामलिंग देवस्थान असून, आम्हा सर्वांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. या देवस्थानचे सेवा करण्याचे भाग्य मला लाभले .
आदित्यशेठ धारिवाल, युवा उद्योजक,विश्वस्त श्री रामलिंग देवस्थान ट्रस्ट, शिरूर.




