डोंगरगण (टाकळी हाजी) ता.शिरूर येथे इंस्टाग्राम वर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून तरुणाला जबर मारहाण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी
डोंगरगण (टाकळी हाजी) ता.शिरूर फाट्यावरील हॉटेल स्वरा येथे फॅब्रीकेशनचे दुकानात काम करत असलेल्या तरुणाला इंस्टाग्राम वर पाठवलेली रिक्वेस्ट का स्वीकारली नाही म्हणून लाकडी दांडक्याने हाताने जबर मारहाण केले प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोहन मळीभाऊ खामकर (वय 21 वर्षे व्यवसाय वेल्डींग रा. शिनगारवाडी म्हसे बु. ता शिरूर)
याने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अमर मुंजाळ (रा डोंगरगणतालुका शिरूर), हर्षद खाडे , करण चव्हाण (दोघे रा, म्हसे बु.) सचिन पवार (पत्ता माहित नाही) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजणेचे सुमारास फिर्यादी डोंगरगण फाट्यावरील हॉटेल स्वरा येथे फॅब्रीकेशनचे काम करीत असतामा चार पाच दिवसापुर्वी इन्स्टाग्राम ला पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याचे कारणावरून चिडुन जावुन शिनगारवाडी गावाजवळील म्हसे बु. येथील खांडे वस्तीवरील अमर मुंजाळ रा डोंगरगण याने त्याचे सोबत हर्षद खाडे, करण चव्हाण दोघे रा. म्हसे बु. व सचिन पवार पत्ता माहित नाही. यांनी येवुन लाकडी दांडक्यांनी, हाताने व लाथाबुक्क्यांनी मला हातावर, तोंडावर व डोक्यात जबर मारहाण करून जखमी केले आहे. याबाबत फिर्यादीने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गायकवाड करीत आहे.