शिरूर पोलीस स्टेशन येथील रेकॉर्डवरील तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार
शिरूर प्रतिनिधी
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दहशत करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड पारनेर श्रीगोंदा तालुका येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
अनिल शिवाजी काळे(रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे) रोहीद प्रमोद उर्फ बाळासाहेब कर्डीले रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे),महेश मच्छिंद्र गायकवाड रा. शिरूर ता. शिरूर जि.पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना व आदेश दिले होते त्या अनुषंगाने.
शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०१८ ते सन २०२४ या कालावधीमध्ये दरोडा घालणे, भांडणे मारामारी, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणे, साधे, गंभीर दुखापती करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, जातीवाचक शिवीगाळ करून वेळोवेळी गुन्हे करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांचा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव शिरूर पोलिस स्टेशन यांच्यावतीने उपविभागीय दंडाधिकारी पूनम अहिरे यांच्याकडे पाठवण्यात आला होता यावर निर्णय देताना अनिल काळे, रोहित कर्डिले (रा. निमोणे शिरूर), महेश गायकवाड (रा. शिरूर) या तीनही गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची गंभीर दखल घेत, त्यांना २ वर्षांसाठी पुणे जिल्हा (पिंपरी-चिंचवड शहर व पुणे शहरासह) तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
वरील आरोपीतांवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून तडीपार हददपार करणेकामी पुणे विभाग अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे पोलीस निरीक्षक सो शिरूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस अमंलदार सचिन भोई तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार महेश बनकर तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, अंबादास थोरे, अजय पाटील, निखील रावडे यांनी कामकाज पाहीले आहे.
येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, तसेच शिरूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात दहशत व गुंडगिरी करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहील.
संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन