शिरूर शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेत साडेपाच कोटी टक्केवारी घेतली का ? शहरात चर्चांना उधाण ... मिळाली तो खुश नाही तो ना खूश...
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरातील 72 कोटी वरून जास्त असणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेत एका माजी लोकप्रतिनिधी व त्यांच्या बगलबच्चांनी साडेपाच कोटी रुपये टक्केवारी घेतली का ? हाच खरा कळीचा मुद्दा आणि शिरूर शहरातील नगर परिषदेमध्ये दोन आघाड्याची आंदोलन केले असल्याची चर्चा असून ,ज्याला मिळाली तो खुश.... नाही मिळाले तो ना खुश....
शिरूर शहरात गेली अनेक दिवसांपासून पाबळ फाटा ते पाषाण माळा हा 800 मीटरच्या रस्त्याचे काम सुरू आहे. रोजच नागरिक आपल्या गाड्यांमध्ये धडाडक धडाडक त्रास करून जाताना ठेकेदार व नगरपरिषद अधिकारी यांच्या आई वडिलांचा उद्धार करून जातात. मोकाट कुत्रे, शाळेचे अर्धवट काम, नवीन मार्केट यार्ड ते हुडको कॉलनी रस्ता, पाण्याचा प्रश्न, घरपट्टी पाणीपट्टी वाढ यासारखे अनेक प्रश्न आहेत.
त्यात आम्हालाही या रस्त्यावरून जाताना लाज वाटते परंतु आंदोलन करणाऱ्यांना लाज वाटत नाही काय ? तुम्ही लाज सोडली आहे का? असेच म्हणावे लागेल. यासारखे अनेक प्रश्न शहरारात भेडसावत आहात पण तुम्ही गप्प का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. एक पंडित यावर आवाज उठवतो तुम्ही चूप का?
एकीकडे वर्षापासून शहरात नवीन पाणीपुरवठा योजना कोट्यावधी रुपयाची सुरू करण्यात आली. ही योजना कोणी मंजूर करून आणली याबाबत वेगवेगळे प्रवाह आहे.
या योजनेमध्ये नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले टक्केवारी याची चर्चा संपूर्ण शिरूर शहरांमध्ये दबक्या आवाजात आहे. तर एका माजी अधिकाऱ्याने क्रेटाकार आणि काही रोख रक्कम घेतले ची चर्चा आहे.
प्रशासनाच्या काळामध्ये कामे करत असताना प्रशासनाच्या अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी शोधण्याचे काम किंवा अनेक प्रश्न प्रलंबित आहे.नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे काम या दोन्हीही आघाडीतील नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी का केले नाही. सत्ता असताना शिरूर शहरात जे सत्तेत असतात त्यांच्या नावाने बोंबा मारणारे आज जो प्रशासनाचे काळात भकास विकास होतोय त्या विकासाबाबत बोलण्यास मूग गिळून गप्प का आहे.
शिरूर शहरात गेल्या आठवड्यामध्ये एका पक्षाने वतीने घंटानात तर एकाच्या वतीने करण्यात आलेले नगर परिषदेच्या बाजूने आंदोलन याबाबत मात्र खरी मेक काय आहे. हे मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही कारण त्यांनाही माहिती आपले फक्त सतरंज्या उचलायचे काम आहे. तुम्ही सतरंज्या उचलत असताना मात्र हुशार नेते कार्यकर्ते मात्र खिसे भरत आहे . तर काही जणांना खिसे भरवायचे आहे हाच मुख्य हेतू आहे याशिवाय दुसरा हेतू असूच शकत नाही.
शिरूर शहराला आंदोलनातून लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे भ्रष्टाचार असून नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणीतरी नगरपरिषद चांगले काम करते म्हणून किंवा प्रशासन चांगले काम करते म्हणून आंदोलन करते अशा पक्षाला मात्र मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न कधी तुम्ही सोडवले का? चार वर्षात तुम्ही व तुमच्या दोन्ही आघाडी व युती यांनी नागरिकांच्या प्रश्नाबाबत कधी आवाज उठवला का? जर उठवला नसेल तर का उठवला नाही. हे सगळे नागरिकांना कळायला हवे. आणि कळून चुकले आहे.
सत्ता येती जाते पद येते जाते परंतु यातून आपण काहीतरी चांगले करायला हवे हे सर्वच पक्ष विसरले आहे. तुम्हाला तुमची पोळी भाजून घेताना कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याची किमया तुम्ही चांगली शोधली आहे. हे सर्व खरे असले तरी शिरूर नगर परिषदेच्या विरोधात केलेल्या आंदोलन व समर्थनात केलेले आंदोलन हे केवळ टक्केवारीसाठी तर नाही ना? ज्याला मिळाली तो खुश ज्याला नाही मिळाली तो ना खुश असेच म्हणावे का ? असे वाटत आहे