शिरूर तालुक्यातील सराईत गुन्हेगार चोरे एक वर्षासाठी स्थानबद्ध - संदेश केंजळे पोलिस निरीक्षक

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील सराईत गुन्हेगार चोरे एक वर्षासाठी स्थानबद्ध - संदेश केंजळे पोलिस निरीक्षक 



शिरूर (प्रतिनिधी) शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकास चोरे याला एक वर्षासाठी एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आह

. विकास उर्फ काज्या बाबाजी चोरे (वय २५, रा. डोंगरजण, ता. शिरूर, जि. पुणे) यास वारंवार गंभीर गुन्हे करून परिसरात दहशत माजविल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक क्रियाकलाप अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे विकास चोरे याच्यावर प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, गावठी पिस्तुले बाळगणे, जमाव जमवून दंगा करणे, शिवीगाळ-दमदाटी करणे, विनयभंग, तसेच बेकायदेशीररीत्या मुरूम उत्खनन करून विक्री करणे अशा स्वरूपाचे एकूण ५ गंभीर गुन्हे सन २०२२ ते २०२५ या काळात नोंद आहेत. वेळोवेळी अटक व प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या वागण्यात काडीमात्र बदल झालानसून,

या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या शिफारशीनुसार व जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या आदेशानुसार दिनांक १९ सप्टेंबर रोजी चोरे यागुन्हेगारास स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार शिरूर पोलिसांनी चोरे याला डोंगरगण येथून ताब्यात घेऊन २० सप्टेंबर रोजी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे जमा केले.

     या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत बोले, शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनखाली ही कारवाई शिरूर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार मंगेश थिगळे, महेश बनकर, पोलिस हवालदार परशुराम सांगळे, पोलिस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ यांनी कामकाज पाहीले आहे.

       शिरूर पोलीस ठाण्याने मागील दोन वर्षांत एकूण ५ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करून तालुक्यातील गुन्हेगारीला मोठा आळा घातला आहे. यापुढेही एमपीडीए, मोक्का व भारतीय न्याय संहितेअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!