शिरुर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा दाखल बँकेचे कर्ज काढून कर्जदाराची लाखोंची फसवणूक केल्याची घटनेने उडाली खळबळ

9 Star News
0

 शिरुर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा दाखल बँकेचे कर्ज काढून कर्जदाराची लाखोंची फसवणूक केल्याची घटनेने उडाली खळबळ 


शिरूर ( प्रतिनिधी )

        गणेगाव दुमाला ता. शिरुर येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून सदर कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता संगनमताने पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असून, शिरुर पोलीस स्टेशन येथे माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप यांच्या विरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे गणेगाव दुमाला ता. शिरुर येथील सचिन गरुड, त्यांच्या दोन मित्रांना २०१९ मध्ये व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांनी अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याकडे दोन वेगवेगळे कर्ज मागणी केली असता सदर बँकेने सचिन गरुड यांच्या गणेगाव दुमाला येथील जमिनीचे गहाणखत करुन घेत अनेक कागदपत्रे घेतले होते, मात्र त्यांनतर सदर अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन्ही बँकांकडून त्यांना कर्ज होईल असे सांगून वेळोवेळी टाळाटाळ करत राहिले, मात्र दरम्यान एका कर्जात चाळीस लाख तर एका कर्जात पंचवीस लाख असे पासष्ठ लाख रुपये कर्ज मंजूर करुन त्याबाबत जमिनीवर बोजा लावून कर्जदारांच्या कर्जाची रक्कम त्यांना न देता सर्व पतसंस्थेचे संस्थापक, चालक व व्यवस्थापक यांनी संगनमत करुन स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करुन घेतली, तर सदर कर्ज होत नसल्याने सचिन गरुड त्यांच्या शेतीकामात व्यस्त राहिले असताना २०२३ मध्ये त्यांना कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आली असता त्यांनी तहसीलदार कार्यालय येथे जाऊन चौकशी केली असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला, त्यांनतर त्यांनी याबाबत शिरुर न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने याबाबत योग्य सुनावणी घेत शिरुर पोलिसांना सदर प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, याबाबत सचिन बाळासाहेब गरुड रा. गणेगाव दुमाला ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार न्यायालयाच्या आदेशाने शिरुर पोलिसांनी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप सर्व रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!