शिरूर नगरपरिषदेच्या गलथान
कारभारा विरोधात महाविकास आघाडीचे घंटानाद आंदोलन
शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेच्या भ्रष्ट आणि गलथान कारभारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आय व महाविकास आघाडी शिरूर यांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमूख, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक आबीद शेख,काँग्रेस आय चे अजीम सय्यद, राणीताई कर्डिले,माजी नगरसेवक अशोक पवार, संतोष थेऊरकर,भीम छावा चेतन साठे,हाफीज बागवान, अँड रवींद्र खांडरे राहील शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्ष गीताराणी आढाव, योगेश जामदार , संतोष थेउरकर, उबाळे, विशाल जोगदंड , कलीम सय्यद,युवराज सोनार योगेश पवार, विराज आढाव, , आदित्य उबाळे अक्षय सोनवणे उपस्थित होते.
यावेळी चिरून नगर परिषदेचे अधीक्षक राहुल पिसाळ , पाणी पुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक डी बी बर्गे यांनी आंदोलन करताना त्यांच्या मागणीबाबत मागण्या पूर्ण करण्याबाबत चे पत्र दिले.
शिरूर नगरपरिषद प्रशासनाच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गलथान कारभार सुरू असून, नागरिकांचे प्रश्न याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. बांधकाम अभियंता मनमानी कारभार करीत आहे. तर मोकाट कुत्र्यांचा उच्छाद मांडला आहे. सर्वच कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अर्धवट रस्त्यांची कामे, अर्धवट पाणी पुरवठा योजना, सर्वच कामात गलथान कारभार व भ्रष्टाचार यामुळे नागरिक मेटाकुटीला आला आहे. भ्रष्ट व गलथान कारभारा विरोधात हे आंदोलन करण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी म्हणाले शिरूर नगर परिषदेमध्ये गेले चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असून शहरातील विविध कामा होण्यास विलंब होत आहे
शहरातील 72 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना केवळ ठेकेदाराच्या मनमानी कामामुळे व त्याला साथ देणाऱ्या शिरूर नगरपरिषद अधिकाऱ्यांमुळे संत गतीने सुरू आहे. याबाबत विचारणा केल्यावर उलट सुलट उत्तरे दिली जातात रस्त्यांची कामे नाही रस्त्यांना पडलेले खड्डे कुठलेही विकास कामे नाही जी विकास कामे केली ती सर्व अर्धवट अशा प्रकारे शिरूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार सुरू असून शहरात नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने योग्य तो कारभार न केल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमुख मंगेश खांडरे म्हणाले
शिरूर नगरपरिषद अनागोंदी व मनमानी कारभार सुरू असून ठेके कोणाला द्यायचे याबाबत वाघोली वरून येऊन एकजण ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर शहरात केवळ पाबळ फाटा ते पाषाणमळा ही 800 मीटरची रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून, याबाबत तीन ठेकेदार नगर परिषदेच्या वतीने नेमले आहे त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी व्हावी तर नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेले नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


