शिरूरमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची पावणे दहा लाखांची फसवणूक
शिरूर , प्रतिनिधी
ऑनलाईन गुंतवणुकीवर अधिक पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून म्हणून तरुणाची ९ लाख ९४ हजार ३२७ रुपयाची इतकी फसवणूक केली असून, या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मंगेश शहाजी पवार (रा. स्टेट बँक कॉलनी, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अनिकेत भाऊसाहेब भुजबळ (रा. पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी मंगेश पवार (रा. स्टेट बँक कॉलनी, शिरूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत भाऊसाहेब भुजबळ (रा. पत्ता माहीत नाही) याने ‘मी तुला जास्त पैसे कमावून देतो’ असे सांगून विविध कंपन्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी 1 मार्च 2024 ते 20 जुलै 2024 या कालावधीत झीटो अँग्रो ओपीसी, आर.एल. ट्रेडर, उत्पल सिंघा, लक्ष्मी एंटरप्रायजेस आदी कंपन्यांच्या खात्यावर तसेच आरोपीच्या स्वतःच्या खात्यावर मिळून ९ लाख ९४ हजार ३२७ रुपये इतकी रक्कम पाठविली.परंतु ठरल्याप्रमाणे जास्त नफा न देता आरोपीने फिर्यादीची रक्कम परत केली नाही. उलट, फिर्यादीने पैसे मागितले असता, ‘जा तुला काय करायचं ते कर, पोलिसात तक्रार केलीस तर तुझा खात्मा करीन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप करीत आहे.