शिरूर दिनांक प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गहिवरल्या अंतकरणाने आणि ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या दणक्यात आकर्षक विद्युत रोषणाई व त्यावरील गणेशांच्या मूर्तीवर देखावे विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले तर
शिरूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक 16 तास रंगली असून,शिरूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मिरवणुक शांततेत पार पडली. तर यंदा पेपर ब्लास्ट हा मिरवणुकीत प्रमुखकर्षक ठरला.
शिरूर पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दुपारी विसर्जन घाट येथे भेटी दिल्या तर शिरूर नगर परिषदेच्या वतीने प्रत्येक गणेश मंडळाचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी सत्कार करण्यात आला तर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांनी मंडळांना भेटी दिल्याने उत्साहा द्विगुणित झाला.
शिरूर शहरातील मानाचा पहिला गणपती राममाळी शिंपी समाज यांनी दुपारी बारा वाजता पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, विश्वस्त राजेंद्र क्षीरसागर, विवेक बगाडे, सिद्धेश्वर बगाडे, ऍड. नाना पाटेकर, महेश बोत्रे,यांच्या हस्ते गणरायाची आरती करून मुख्य मिरवणुकीस सुरवात झाले त्यानंतर मानाचा दुसरा गणपती शिवसेवा मंदिर गणरायाची आरती ट्रस्ट चे सचिव मनसुख गुगळे, विश्वस्त माऊली घावटे, श्रीनिवास परदेशी यांच्या हस्ते आरती करण्यात करून मिरवणुकीत सहभागी झाले त्यानंतर शिरूर मानाचा तिसरा गणपती हनुमान मंदिर मारुती आळी यांनी हा 12 फुटी देखावा घेऊन तर मानाचा चौथा गणपती श्री विठ्ठल मंदिर कुंभारआळी तर मानाचा पाचवा गणपती हनुमान मंदिर कामाठीपुरा या मानाच्या गणपती या तीन गणरायाची सायंकाळी विद्युत रोशनाईचे मंदिर यासह विसर्जन मिरवणूक मध्ये सहभाग घेतला.तर यंदा श्रीमंत हलवाई गणेश मंडळाचे ५० वे वर्ष असल्याने आकर्षक मयूर रथ विद्युत रोषणाईने नटलेला मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला
.श्री. रसिकभाऊ धारिवाल गणेश मित्र मंडळ आडत बाजार यांनी पुष्पक विद्युत रोशनाईचा रथ व पारंपरिक वाद्य,
गोपाळ गणेश मंडळांनी यंदा स्वामी समर्थ रथातातून तर मोठी तालीम गणेश मंडळाने भगवान महादेव रथातून, पूर्वामुखी हनुमान गणेश मंडळ यांनी यंदा विष्णू लक्ष्मी रथातून तर भला मोठा सिंह याने भक्तांचे लक्ष वेधून घेतले. महाराणा प्रताप गणेश मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही पालखीतून व पारंपरिक वाद्याचा गजरात मिरवणूक काढण्यात आली. सुभाष चौक,आझाद गणेश मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाई मंदिराने भक्तांची वाहवा मिळवली, मुंजोबा गणेश मंडळांनी यंदा शंकर महाराज मूर्ती रथातून, रेव्हेन्यू कॉलनीतील त्रिमूर्ती गणेश मंडळ व सिद्धार्थ प्रतिष्ठान ची भव्य अशी गणेश मूर्ती पुष्परथात व विद्युत रोषणाई ने नटलेली होती, संभाजी नगर हुडको कॉलनी यांनी आजाद सोशल अँड स्पोर्ट क्लब लाटेआळी व जय बजरंग गणेश मित्र मंडळ जोशीवाडी मंडळाने बग्गी सह विद्युत रोषणाईने सजलेल्या रथातून,
रामलिंग गणेश मित्र मंडळ करंजुले वस्ती यांच्या श्री गणेशाची मूर्ती आकर्षक अश्या रथावर आरुढ होती, छत्रपती संभाजी महाराज व सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळ छत्रपती संभाजी नगर (हुडको कॉलनी ) विद्युत रोषणाई मंदिरात,राजमाता जिजाऊ मित्र मंडळ मंगलमूर्ती नगर, मुंबई बाजार गणेश मंडळ,शिरुर नगरपरिषद कामगार गणेश मंडळ , सरदार पेठ गणेश मंडळ,पाच कंदिल चौक गणेश मित्र मंडळ व छ्त्रपती शिवाजी गणेश मंडळ लाटेआळी या गणेशाचे दुपारी विसर्जन झाले .डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक यांनी दुपारी तर सूरजनगर गणेश मित्र मंडळ , खारा मळा गणेश मित्र मंडळ,आखिल गुजर मळा् गणेश मित्र मंडळा यांनी पुष्पक रथ शिरूरचा राजा सुभाष चौक व विद्युत रोषणाईच्या मंदिरातून मिरवणूक काढली होती.
शिरूर पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक संदेश केंजळे मिरवणुकीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर शिरूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शाळा मैदान या ठिकाणी निर्माल्य संकलन व कुंडामध्ये गणेश विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी प्रतिसाद दिला तर शिरूर शहरातील मुख्य गणेश विसर्जन घाट शनी मंदिर या ठिकाणी नदीमध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती तर गणेश मूर्ती संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात मूर्ती नागरिकांनी दिले आहेत. नगर परिषदेच्या वतीने विसर्जन हौद व निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये दोन टन निर्माण गोळा झाले आहे. तर मोठ्या प्रमाणात मूर्ती अनेक गणेश भक्तांनी दान केले आहे.
श्रीमंत हलवाई गणेश मंडळाने तयार केलेले मयुर रथ व विद्यु
त रोषणाई