रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक, 1 लाख 5 हजारांचे 8 मोबाईल जप्त
शिरूर प्रतिनिधी
रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरूर) रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी परराज्यातील बांधकाम कामगारांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना अटक करत 1 लाख 5 हजार रुपये किमतीचे 8 मोबाईल जप्त करण्यात यश मिळवले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे.
याप्रकरणी अथर्व राहुल काळे (रा.बाभूळसर खुर्द ता. शिरूर जि. पुणे) व दुसरा विधी संघर्ष बालक ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अर्जुन निर्मल चौहान (वय २१, रा. उत्तर प्रदेश) व त्याचे सहकारी बांधकामावर खोलीत झोपलेले असताना तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीत घुसून 40 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरी करून पळ काढला. याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे फोन करून रांजणगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली तत्काळ पोलीस त्या ठिकाणी येऊन, पोलिसांनी व बांधकाम कामगारांनी परिसरात शोध घेत दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातील 40 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत आरोपींनी अशा प्रकारे मोबाईल चोरीचे इतर गुन्हे शिरूर व रांजणगाव परिसरात केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून आणखी ६५ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे ८ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून दोन घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार राजेश ढगे, नितीन भोस, पोलिस कॉन्स्टेबल गणेश वाघ, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर व संदिप भांड यांनी केली. तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलिस हवालदार अभिमान कोळेकर करीत आहेत.