शिक्रापूर येथील शेरखान शेख व अमर गोडांबे क्रांतिसूर्य कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

9 Star News
0

 शेरखान शेख व अमर गोडांबे क्रांतिसूर्य कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित


शिरूर 

(  प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरूर येथील सर्पमित्र व प्राणीमित्र शेरखान शेख व सर्पमित्र अमर गोडांबे यांना क्रांतिसूर्य शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतिसूर्य प्राणीमित्र कार्यगौरव पुरस्कार २०२५ देऊन गोरविण्यात आले आहे.  

                           शिक्रापूर ता. शिरूर येथील सर्पमित्र शेरखान सिकंदर शेख तसेच भोसरीचे सर्पमित्र अमर नारायण गोडांबे यांनी वन्य पशु पक्षांच्या रक्षणासाठी विशेष कार्य करत अनेक सापांसह वन्य पशु पक्षांना जीवदान देऊन परिसरात सर्प व वन्यजीवांबाबत जनजागृती केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना क्रांतिसूर्य शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात खासदार भाऊसाहेब वाघचौरे, समाजश्री दिपक पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय क्रांतिसूर्य प्राणीमित्र कार्यगौरव पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले असून याप्रसंगी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रभावती घोगरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप सोनवणे, क्रांतिसूर्य शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष खंडू सातपुते, सचिव गोरक्ष भवर, अविनाश फुलाटे, शांताराम साळके, देवेंद्र इथापे, सुरज शिंदे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संचालक राहुल त्रीकुटे, नेहा गोडांबे, उर्मिला त्रीकुटे, नसीम शेखे यांसह आदी उपस्थित होते, शेरखान शेख व अमर गोडांबे यांना राज्यस्तरीय क्रांतिसूर्य प्राणीमित्र कार्यगौरव पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथील पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले शेरखान शेख व अमर गोडांबे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!