शिरूर तालुक्यातील सणसवाडीत पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार एकालाअटक
शिरूर
( प्रतिनिधी )सणसवाडी ता. शिरूर येथे पाचवर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय तरुणाच्या शिक्रापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
फंटूसदास दिलीप मोची (सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. गोपाळपूर ता. चानन कुमादर जि. लखीसराय बिहार) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.
सणसवाडी ता. शिरूर येथील महिला घरात असताना तिची पाच वर्षीय बालिका तिच्या भावासह घराबाहेरील वाळूमध्ये खेळत असताना फंटूसदास मोची याने बालिकेच्या भावाला चॉकलेट आणण्यासाठी पैसे देऊन दुकानात पाठवून बालिकेला शेजारील खोलीमध्ये घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत बालिकेच्या आईने शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी फंटूसदास दिलीप मोची सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. गोपाळपूर ता. चानन कुमादर जि. लखीसराय बिहार याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करत आहे
.

