रांजणगाव एम आय डी सी पोलीसांची अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई २८ किलो वजनाचा सात लाखांचा गांजा जप्त, एक महिलेसह दोन आरोपी अटकेत
शिरूर प्रतिनिधी
बाभुळसर खुर्द ता.शिरूर येथील सृष्टी सोसायटी मधील एका रो हाऊसवर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून २८ किलो गांजा किंमत ७ लाख रुपये किमतीचा जप्त करून महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे.
या कार्यवाहीत दोघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला आहे. आरोपींना शिरूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिव्या अतुल गिरे (वय 27, रा. सृष्टी सोसायटी, बाभुळसर खुर्द, मुळगाव देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि सुरज दिलीप शिंदे (वय 28, रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली असून, अतुल वसंत गिरे ( रा.सृष्टी सोसायटी, बाभुळसर खुर्द, मुळगाव देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हा फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की बाभूळसर खुर्द येथील सृष्टी सोसायटी येथे गांजा विक्री व साठवणूक केली आहे.
याबाबत शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना माहिती देऊन अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सदर बातमी मिळाल्या ठिकाणी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास दोन पथकासह जावुन छापा टाकण्यात आला या छाप्यांमध्ये दिव्या गिरे व सूरज शिंदे हे दोघे आढळून आले त्यांच्या घराची झडती घेतली असता २८ किलो गांजा हा अमली पदार्थ किंमत ७ लाख रुपयांचा आढळून आला तर अधिक चौकशी केली असता हा गांजा दिव्या गिरे यांचे पती अतुल गिरे यांनी विक्रीसाठी आणून दिल्या असल्याचे आरोपींनी सांगितले.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप गिल्ल , पुणे विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे , शिरूर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस पोलिस हवालदार विजय सरजिने, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल गणेश वाघ, उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड, महिला पोलीस हवालदार विद्या बनकर, पोलिस हवालदार माऊली शिंदे, पोलिस हवालदार पांडुरंग साबळे, पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर आव्हाड, पोलिस हवालदार हेमंत इनामे या पथकाने केली आहे.
पुढील तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहे.