शिरूर पोलिस स्टेशन मार्फत बेवारस ५० वर्षीय अनोळखी मयत व्यक्तीचा शोध सुरू
शिरूर प्रतिनिधी
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे 50 वर्षे पुरुषाचा महिनाभरापूर्वी अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या अनोखी पुरुषाचा शोध शिरूर पोलीस करीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ६.४५ वाजता मौजे अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका अज्ञात पुरुषाचा मृत्यू झाला. सदर प्रकरणाची नोंद शिरूर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे वय अंदाजे ५० वर्षे,
डोक्याचे केस पांढरे व दाडीला पांढरे केस,वर्ण निमगोरा, बांधा मध्यम,अंगात पिवळसर गुलाबी चेक्स डिझाईनचा फुलबाह्यांचा शर्ट, राखाडी रंगाची फुलपॅन्ट व निळसर रंगाची अंडरवेअर पोटावर उजवीकडे तीळ असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पुरुषाचा मृत्यु प्राथमिक तपासात हा रस्ते अपघातामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मृतदेह अद्याप ओळख पटलेला नसल्याने, परिसरातील नागरिकांनी किंवा संबंधित व्यक्तींनी या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास तात्काळ शिरूर पोलिस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार जी. एन. पालवे +91 95525 57162 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिरूर पोलीस स्टेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.