शिरुरमध्ये ड्रग्ज घेऊन फिरणारा युवक जेरबंद पोलिसांच्या कारवाईत ७२ हजाराचा मॅफेड्रॉन ड्रग्जव मोटर सायकल जप्त

9 Star News
0

 शिरुरमध्ये ड्रग्ज घेऊन फिरणारा युवक जेरबंद...पोलिसांच्या कारवाईत ७२ हजाराचा मॅफेड्रॉन ड्रग्जव मोटर सायकल जप्त


शिरूर ( प्रतिनिधी )

           शिरुर शहरातील नवीन नगर पालिका परिसरात ड्रग्ज घेऊन आलेल्या युवकावर शिरुर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन युवकाकडून तब्बल बावीस हजार रुपयांचे मॅफेड्रॉन ड्रग्ज व एक मोटर सायकल असा एकूण ७२ हजाराचा ऐवज जप्त करत युवकाला अटक केली असल्याची माहिती शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. शिरूर पोलिसांनी केलेली ही एमडी ड्रग्स ही पहिलीच कारवाई आहे याचे नागरिकांनी कौतुक केले असुन यावर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

          शिरूर शहरात अटक केलेल्या १९ वर्षीय पवन भंडारे या तरुणाला पाहून हा ड्रग विक्री करू शकतो का? जर करत असेल तर याच्या मागे मोठा आका आहे तो कोण? पोलिस त्याच्यापर्यंत पोहचणार का?

                याबाबत पोलीस हवलदार विजय गजानन शिंदे (रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे )यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी पवन सागर भंडारे (वय १९ वर्षे रा. वाडा कॉलनी शिरुर ता. शिरुर जि. पुणे ) याला अटक केली आहे.

         शिरुर शहरातील नवीन नगर पालिका परिसरात एक युवक मॅफेड्रॉन ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यांनतर शिरुर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता त्यांना एक संशयित युवक दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ मॅफेड्रॉन नावाची ड्रग्ज पावडर मिळून आली, यावेळी पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेत तिच्या जवळील तब्बल बावीस हजार रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले, याबाबत पोलीस हवलदार विजय गजानन शिंदे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी पवन सागर भंडारे वय १९ वर्षे रा. वाडा कॉलनी शिरुर ता. शिरुर जि. पुणे या युवकावर गुन्हा दाखल करत अटक केली असून, त्याला १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खींग, शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, पवन तायडे, भाउसाहेब ठोसरे, अजय पाटील या पोलीस पथकाने केली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे हे करत आहे.

         शिरूर शहर व पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात ड्रग सेवन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेकांची संसार उध्वस्त होत आले आहे. शिरूर रामलिंग सरदवाडी कारेगाव रांजणगाव करडे ढोक सांगवी या भागात मोठ्या प्रमाणात खुले आम ट्रक विक्री होत आहे परंतु याकडे म्हणावी अशी कारवाई अद्याप झाली नाही. कारण या ठिकाणी ड्रग विक्री करणारे आका यांची वरपर्यंत संबंध असल्याचे बोलले जात आहे. परंतु या भागातील अनेक शेतकरी कुटुंब यामुळे हैराण झाली असून मुले आईबापांच्या बायकोच्या जीवावर उठले असल्याचे अनेक प्रकार

 घडले आहे .ते केवळ ड्रगचे व्यसन करण्यासाठी पैसे नदिल्याने. अनेक तरुण आई-वडिलांना शेती, घरदारे विकण्यासाठी ही दबाव आणण्यात असल्याचे अनेक तक्रारी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!