शिरूर नगरपरिषदेकडून गणेश विसर्जन व मिरवणुकी करीता सज्ज - प्रितम पाटील मुख्याधिकारी

9 Star News
0

 शिरूर नगरपरिषदेकडून गणेश विसर्जन व मिरवणुकी करीता सज्ज - प्रितम पाटील मुख्याधिकारी 



शिरूर . प्रतिनिधी 

       शिरूर नगरपरिषदेकडून गणेश विसर्जनासाठी पूर्वतयारी करण्यात आलेली असून, रस्त्यावरील खड्डे बुजवले, वाढलेले झाडांच्या फांद्या छाटल्या असून, नदी किनारी विसर्जन घाटाची स्वच्छता दिवे लावले असून यासह गणेश विसर्जनासाठी सुसज्ज तयारी कृत्रिम तलाव बॅरिगेटेड अशी पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.

       पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शनि मंदिर विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट व रयत शाळेचे मैदान या ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद(कुंभ) तयार करण्यात आले आहेत. तसेच निर्माल्य संकलनासाठी विशेष निर्माल्य कलशांची सोय करण्यात आली आहे.

      पाचवा, सातवा व अकरावा दिवशी होणाऱ्या विसर्जनावेळी सुव्यवस्था राहावी यासाठी नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच नगरपरिषदेच्या वतीने श्री गणेश मूर्ती संकलन उपक्रम राबविण्यात येणार असून, मूर्ती संकलनासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविणाऱ्या भक्तांना “पर्यावरण दूत” प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी सांगितले.

         विसर्जनासाठी कृत्रिम हौद/कुंभाचा वापर करावा किंवा मूर्ती संकलन उपक्रमामध्ये मूर्ती द्याव्यात. निर्माल्य नदीपात्रात न टाकता निर्माल्य कलशातच टाकावे.नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे विसर्जन करताना विशेष खबरदारी घ्यावी.नदी स्वच्छ राखण्यासाठी, नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नयेत यासाठी व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शिरूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!