शिरूर घोडगंगा चेअरमन ऋषीराज पवार प्रकरणात शिरूर मांडवगण फराटा पुणे वाघोली कनेक्शन का ?

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर विधानसभा मतदारसंघात मांडवगण फराटा येथे घडलेल्या आमदार पुत्र ऋषीराज पवार अपहरण प्रकरणात पुणे मांडवगण फराटा वाघोली कनेक्शन का ? याबाबत चर्चांना उधाण आले असून पवार यांच्या घरासमोर तीन दिवस फिरणारी कार कोणाची याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे हे प्रकरण राजकीय वळण घेणार का ? याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे 

          काल दुपारी मांडवगण फराटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांची चिरंजीव घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची चेअरमन ऋषिराज पवार यांना प्रचारा दरम्यान त्यांच्याच पक्षात दीड ते दोन महिन्यांपूर्वी आलेल्या भाऊसाहेब कोळपे यांने काही कार्यकर्त्यांची गुप्त बैठक घ्यायची सांगून एका बंगल्यावर नेऊन पवार यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत महिलेबरोबर अश्लील फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग व खंडणी मागितल्या प्रकारे शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. 
        सर्वांना हा प्रकार म्हणजे राजकीय स्टंट असल्याचे बोलले जात होते परंतु आरोपी अटक झाल्याने ही सत्य घटना समोर आली आहे. 
          
            चेअरमन ऋषीराज पवार यांच्या घराच्या आजूबाजूस गेल्या तीन दिवसापासून एक कार फिरत होती ही कार कोणाची. या प्रकरणात राजकीय लोकांचा सहभाग आहे का हे पाहणे गरजेचे असले तरी आताही प्रकरण वेगळे वळणावर जाऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. 
              तर आरोपीने चेअरमन ऋषिराज पवार यांना डांबून व अपहरण केल्यानंतर आम्हाला समोरच्याकडून व पुण्यातून दहा कोटीची सुपारी तुमची असले फोटो काढण्यासाठी दिले आहे. असे सांगितले आहे. 
               या प्रकरणानंतर शिरूर पोलीस स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले होते. यामध्ये आरोपीकडे काही नेत्यांची चॅटींग असल्याची चर्चा आहे. त्यात मांडवगण निर्वी पुणे वाघोली येथील लोकांची चर्चा होती.
             त्यामुळे ऋषिराज पवार यांच्या या प्रकरणात पुणे वाघोली शिरूर तालुक्याची कनेक्शन आहे का?
असे असेल तर शिरूर तालुक्यातील राजकारण अतिशय खालच्या स्तरावर गेले आहे असेच म्हणावे लागेल.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!