शिरूर
( प्रतिनिधी ) विधानसभा निवडणूका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांचे शस्त्र जवळील पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले असताना शिरुर तालुक्यातील ४४२ शस्त्रे जमा करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले असताना आता शिरुर तालुक्यातील ४३७ शस्त्रे पोलिसांकडे जमा झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
विधानसभा मतदार संघात निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये तसेच सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश निर्गमित करण्यात आले असताना पुणे जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले असताना शिरुर तालुल्यातील देखील ४४२ शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील ११९ पैकी ११६, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील २७३ पैकी २७१ तर रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन हद्दीतील ५० पैकी शस्त्रपरवाना धारकांनऊ त्यांच्या जवळील शस्त्रे पोलीस स्टेशन मध्ये असून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक शस्त्र परवाना धारक बँक सुरक्षिततेसाठी तर दोन शस्त्र परवाना धारक मंदिर ट्रस्ट सुरक्षेसाठी आणि शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दोन शस्त्र परवाना धारक बँक सुरक्षेसाठी असल्याने त्यांना सुट देण्यात आली असून शिरुर तालुक्यातील ४४२ शस्त्रे पैकी ४३७ शस्त्रे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार शिक्रापूर, शिरुर व रांजणगाव एमआयडीसि पोलिसांकडे जमा झाले आहे.