जांबूतमध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण विसावा हॉटेल चालक दांपत्यावर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल

9 Star News
0

 जांबूतमध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

विसावा हॉटेल चालक दांपत्यावर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल


शिरूर ( प्रतिनिधी ) 

       जांबूत ता. शिरुर येथे महिलेने भाडेतत्वावर हॉटेलसाठी दिलेली जागा खाली करत नसल्याने झालेल्या वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे निलेश बबन पळसकर व सुजाता निलेश पळसकर यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी , मारहाण प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे जांबूत ता. शिरुर येथील इंदुबाई सोनवणे यांनी त्यांची पाच गुंठे जागा निलेश पळसकर यांना हॉटेल साठी भाडे तत्वावर दिलेली होती, २०२२ मध्ये सदर जागेचा भाडेकरार संपून देखील निलेश जागा खाली करत नसल्याने इंदुबाई या सदर जागेतील हॉटेल विसावा येथे जात निलेश याला जागा खाली करण्याबाबत बोलत असताना निलेश याने इंदुबाई यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत काय करायचे ते कर असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली, दरम्यान इंदूबाई हॉटेल मधील खुर्च्या बाहेर घेत असताना निलेशने पत्नी सुजाताला बोलावून घेतले असता सुजाताने इंदीबाईंना ढकलून दिल्याने त्या खाली पडून जखमी झाल्या असता त्यांचे पती सुभाष यांनी त्यांना सावरले यावेळी निलेशने पुन्हा घरी फोन करुन लोकांना बोलावून घेतल्याने जास्त लोक झाल्याने सुभाष सोनवणे हे जखमी पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, 

      याबाबत इंदूबाई सुभाष सोनवणे वय ५५ वर्षे रा. जांबूत ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी निलेश बबन पळसकर व सुजाता निलेश पळसकर दोघे रा. जांबूत ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले हे करत 

आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!