करंदी ता. शिरूर येथे दुकानात बसलेल्या आजीकडे पाणी बाटली घेण्यासाठी आलेल्या दोघा तरुणांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व सोन्याची पोत हातच्यालाखी करून लांबवली असून याबाबत दोन अज्ञात तरुणांवर रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोनुबाई सुदाम खेडकर वय ७५ वर्षे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
यांबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे करंदी ता. शिरूर येथील सोनुबाई खेडकर या आजी त्यांच्या दुकानात असताना दोन युवक दुचाकीवरून आले त्यांनी सोनुबाई या आजींना पाण्याची बाटली द्या असे म्हटले याच वेळेस एका युवका ने आजी तुमच्या अंगावर किती दागिने आहे, या वयात तुम्हाला इतके दागिने कशाला हे चांगलं नाही असे म्हणून दागिने कागदात व्यवस्थित बांधून देतो, कागदावर ठेवा असे म्हटले दरम्यान आजीने गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची पोत व एक तोळा वजनचे गंठण काढून कागदावर ठेवले यावेळी सदर युवकांनी कागदाची पुडी बांधून आजीकडे दिली आणि निघून गेलेनंतर लगेचच आजीने पुडी पाहिली असता त्यामध्ये दागिने नसल्याचे दिसून आले याबाबत सोनुबाई सुदाम खेडकर वय ७५ वर्षे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.