फिल्मी स्टाईलने पाठलाग करत लिफ्टमध्ये जाणाऱ्या महिलेला लुटले; शिरूरकर संतप्त
शिरूर (प्रतिनिधी) शिक्रापूर येथे भरदिवसा आणि लोकवस्तीमध्ये चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने पाठलाग करत लिफ्टमध्ये जात असलेल्या महिलेला लक्ष्य करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. गर्दी असतानाही चोरटे कोणालाही भीक न घालता निर्भीडपणे चोरी करून पसार झाले.
ही घटना फक्त एकटी नाही. कालच शिरूर परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रकार घडला होता. दोन दिवसांत याच प्रकारे लिफ्टमध्ये महिला जात असताना अचानक टोपी घातलेला तोंडाला रुमाल बांधलेला चोरटा येऊन त्याने अचानक महिलावर हल्ला करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिचकवून पळून गेला आहे.यामुळे महिला लुटल्या गेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी रोष आहे.
पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असून शिरूर तालुक्यात मध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी यावर तातडीने उपाययोजना करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. "पोलीस प्रशासनाने केवळ गस्त वाढवून नव्हे तर ठोस कारवाई करून चोरट्यांना धडा शिकवावा", या मंगळसूत्र चोरांनी पोलिसांना आव्हान दिले असल्याचे दिसून आले आहे.