कारेगावमधील गोरेश्वर मल्टीस्टिक पतसंस्थेवर दरोड्याचा प्रयत्न
शिरूर (प्रतिनिधी) –
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील गोरेश्वर मल्टीस्टिक पतसंस्थेवर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उत्कटून आत मध्ये प्रवेश करून दरोड्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला असून याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
ही पतसंस्था स्थानिक पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असूनही चोरट्यांनी असा प्रयत्न केल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.