शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथे रामलिंग रोडवर ओ एस इज कॉलनी येथे पत्ता विचारण्याच्या भानेने मोटार सायकलवर आलेल्या दोघाजणांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याचे मंगळसूत्र 90 हजार रुपयांचे जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले आहे.
याबाबत छाया आनंद सातारकर (वय 65 रा. ओयेसीस कॉलनी रामलिंग रोड शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
. याप्रकरणी 2 अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादी वरून दिनांक २ऑगस्ट दुपारी 12/45 वाजताच्या दरम्यान रामलिंग रोडवरील ओयासीस कॉलनी आनंतविहार बंगल्यासमोर फिर्यादी फुले तोडत असतांना त्यावेळी एका काळया रंगाच्या युनिकॉर्न मोटार साईकल वरून अंदाजे 30 ते 35 वयाचे दोन अनोळखी इसम आले त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने मला माने सर इथे कुठे राहताता का असे विचारून त्यांना मी मला काही माहित नाही सांगितले नंतर ते दोघेजण तसेच निरंकर हॉस्पीटल कडे जावुन पुन्हा तेथुन वळुण आमचे बंगल्यासमोर येवुन मी फुले तोडत असताना त्यातील पाठीमागे पांढरा शर्ट ,काळी पॅन्ट ,पांढरे स्पोर्ट शुज ,डोक्यावर निळे रंगाची टोपी घातलेला अनोळखी इसमाने माझे गळयातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र नव्वद हजार रुपयांचे जबरदस्तीने हिसका मारून चोरून ते दोघेजण युनिकॉर्न मोटारसायकलवरून पळुण गेले आहे.
फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.