शिरूर कुंभारआळी येथे ऑपरेशन सिंदूर चा पहिला तोफगोळा चालवणाऱ्या जवान राजेश गोपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण
शिरूर प्रतिनिधी
शिरूर कुंभारआळी येथे ऑपरेशन सिंदूर चा पहिला तोफगोळा चालवणाऱ्या जवान राजेश गोपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून देशाचा स्वतंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी भारत -पाक यांच्या दरम्यान जे युद्ध झाले त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिले गेले. त्या ऑपरेशन सिंदूर ची सुरुवात करताना भारतातर्फे जो पहिला प्रतिहाल्ला करण्यात आला त्याचा पहिला गोळा शिरूर चे जवान राजेश गोपाळ यांच्या रेजिमेंट ने सोडला होता.त्या प्रसंगाच्या आठवणी सांगत असताना सर्व उपस्थित्यांच्या अंगावर शहारे आले.पहिल्या गोळ्याने कसा पाकिस्तान चा मुख्य लष्करी तळाचा अचूक वेध घेतला याचा रंजक किस्सा या वेळी त्यांनी बोलून दाखवला.
हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही त्या साठी अनेकांनी घर, संसार, तरुणपण, प्राण यांचे त्याग केले तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले.. ते आपण प्राण पणाने जपले पाहिजे असे विचार कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार यांनी बोलून दाखवले.
या वेळी बालवाडीच्या विध्यार्थ्यांना नितीन जामदार यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.
या वेळी बाळासाहेब जामदार, दगडू त्रिमूखे, विजय शिर्के, संभाजी जामदार,राजकुमार जामदार, सुनील भावटणकर, संदीप कडेकर, संतोष जामदार,शंकर जामदार, विनोद शिर्के,संजय कडेकर, विनायक जामदार,बाबुराव जामदार सुनील शिर्के, विक्रम जामदार, दिपक शिर्के,राजेंद्र गोरडे,संजय राजापूरे,चरण जामदार नितीन शिर्के सह अनेक महिला भगिनी उपस्थित होते.